बुलडाणा (Kargil Vijay Day) : २६ जुलै हा दिवस आपल्या देशात “कारगील विजय दिन” (Kargil Vijay Day) म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो, यावर्षी हा दिवस बुलडाणा अर्बन परिवार (Buldana Urban) व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी संयुक्तपणे साजरा करण्याचे ठरविले असुन सदर कार्यक्रम उद्या शुक्रवार २६ जुलै रोजी सहकार विद्या मंदीर सांस्कृतिक सभागृहात साजरा होणार आहे.
२६ जुलै १९९९ रोजी आपल्या देशाच्या सैन्याने कारगील युध्दात विजय मिळविला होता, तेव्हापासुन हा दिवस “कारगील विजय दिन” (Kargil Vijay Day) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी २६ जुलै रोजी या विजयी दिनाला २५ वर्ष पुर्ण होत आहेत, त्यामुळे रोप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन यावर्षी हा दिवस मोठया प्रमाणात संयुक्तपणे साजरा करण्याचे बुलडाणा अर्बन परिवार (Buldana Urban) व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय (Soldier Welfare), बुलडाणा यांनी ठरविले. २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा गोरे स्मारक येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली जाणार आहे व त्यानंतर तेथुनच शहीद सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली तहसिल चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, एडेड चौक व चिखली रोडने सहकार विद्या मंदिरात म्हणजे गेल्यावर प्रांगणात बसविण्यात आलेल्या व कारगील युध्दात कामगिरी बजावलेल्या मिग-२१ विमान, रणगाडा व अँकरला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. तसेच याच कार्यक्रमाचे निमित्ताने युध्दातील विविध शस्त्रांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून सामान्य नागरीकांना पहावयाचे असल्यास त्याचदिवशी १०.३० ते ४ या वेळेत त्यांना पाहता येणार आहे.
या दिनाचे औचित्य साधुन जिल्हयातील वीरनारी व वीरयोध्दयांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे. या (Kargil Vijay Day) कार्यक्रमाचे उद्घाटक बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, आ. धीरज लिंगाडे हे राहणार असुन कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, मा. कर्नल सुहास जतकर, स्क्वाड्रन लिडर सौ. रुपाली सरोदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व डॉ. सुकेश झंवर, सौ. कोमलताई झंवर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या विजयदिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवार (Buldana Urban) व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण (Soldier Welfare) कार्यालय, बुलडाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.