सहकार विद्या मंदीरात झाला साजरा कारगील विजय दिन!
बुलडाणा (Kargil Vijay Day) : २६ जुलै हा दिवस आपल्या देशात कारगील विजय दिन (Kargil Vijay Day) म्हणुन साजरा करण्यात येतो, यावर्षी हा दिवस (Buldana Urban) बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी सहकार विद्या मंदीराचे सांस्कृतिक हॉलमध्ये संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
२६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगील युध्दात विजय मिळविला होता, यावर्षी २६ जुलै रोजी या (Kargil Vijay Day) विजयी दिनाला २५ वर्ष पूर्ण झाले, रजत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन हा दिवस (Buldana Urban) बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी संयुक्तपणे साजरा केला. सकाळी ९.३० वाजता हुतात्मा गोरे स्मारक येथे हूतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन व मानवंदना देवुन करण्यात आली. याप्रसंगी शौर्यचक्र विजेते रमेश बाहेकर, सेनामेडल विजेते रामदास वाघ यांचेवतीने त्यांचे सुपुत्र सुरेश वाघ, बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, कर्नल सुहास जतकर संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, स्काॅडून लिडर डॉ. रुपाली सरोदे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा व तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली.
त्यानंतर शहीद सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. बिर्याणी शहरातून मार्गक्रमण करत सहकार विद्या मंदीर सांस्कृतिक हॉल पोस्ट पोहचली. सहकार विद्या मंदीराचे प्रांगणात बसविण्यात आलेल्या व कारगील युध्दात कामगिरी बजावलेल्या मिग-२१ विमान, रणगाडा व अँकरला आ. संजय गायकवाड, आ. धिरज लिंगाडे, राधेश्यामज चांडक व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याच कार्यक्रमाचे निमित्ताने युध्दातील विविध शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या (Kargil Vijay Day) दिनाचे औचित्य साधुन जिल्हयातील विरनारी व विर योध्दयांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, साडी/ड्रेस देवुन व मानपत्राचे वाचन करुन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रास्तावीक डॉ. सुकेश झंवर यांनी केले. तर आ. संजय गायकवाड यांनी सैनिकांप्रती भावना व्यक्त करतांना बुलडाण्यात सैनिकी रुग्णालय व सैनिक भवन लवकरच निर्माण करणार असुन त्यामाध्यमातुन सैनिकांची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला. आ. धिरज लिंगाडे यांनी (Kargil Vijay Day) सैनिकांची कर्तव्य तत्परता व मातृभुमीप्रती असलेले प्रेम व त्यातुन निर्माण होणारी राष्ट्रभक्ती विषद केली. जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी सैनिकांप्रती असलेला आदर आपल्या शायरी व गझलच्या माध्यमातुन व्यक्त केला. सुत्रसंचालन कर्नल सुहास जतकर यांनी केले. यावेळी पोलीसांच्या वतीने बिगुल वाजवुन शहीदांना मानवंदना देण्यात आली. तसेच पोलीस दलाच्या वतीने पोलीस बॅण्डवर राष्ट्रगीत म्हणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.