परभणी/गंगाखेड (Karjali case) : करजली येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन सोमवार १७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या (Karjali case) करजली गावात एका नराधमाने अत्यंत वाईट पध्दतीने ५ ते ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून खुन केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली. दिवसेंदिवस समाजात घडणाऱ्या अशा प्रकारच्या अमानवी घटना टाळण्यासाठी व अत्यंत निच वृत्तीच्या अशा नराधम लोकांवर कायद्याचा धाक राहावा यासाठी (Karjali case) करजली येथील चिमुकल्या मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या (Karjali case) निवेदनावर अमजद पठाण, खुर्रम चाऊस, अजिज सय्यद, इम्रान शेख, फारोख पटेल, शेख समीर, बबलू पठाण, शेख जुबेर, नजीर पठाण, सय्यद इसा, शेख सिराज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.