नागपूर (Boxing Championship) : द वर्ल्ड असोसिएशन ऑफ किक बॉक्सिंग संघटना (Boxing Championship) आणि वाको इंडियाद्वारे गोवा येथे आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत शहरातील कार्तिकेय सिंह घोडाम यांनी रौप्य पदक पटकाविले आहे. त्याचे शहरात आगमन होताच मानव सेवा संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्तिकेय सिंह घोडाम हे राज्य स्वर्ण पदक विजेते असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी मे २०२४ मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. कठारे परिश्रम घेत ते राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
किक बॉक्सिंगच्या (Boxing Championship) दोन्ही श्रेणीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत रौप्य पदक पटकाविले. त्यांचे शहरात आगमन होताच रामभाउ धुर्वे, अरविंद मसराम, नितेश आत्राम, सूर्यभान पुसाम, मकरंद मसराम, प्रफुल पेंदाम, दुर्गेश मसराम, पूर्णिमा पेंदाम, निरंजन इरपाते, अभिषेक मसराम, आर्यन धुर्वे, नीरज शिंगुमारे, किसान मरस्कोल्हे, आकाश धुर्वे, उमेश टेकाम, विनोद मसराम, बंटी उइके, देवासिंह घोडाम आदी मित्र परिवारांनी कार्तिकेय सिंहचे अभिनंदन केले.