वर्धा(Wardha):- बोलू बरच काही या नावाजलेल्या YouTube चैनल व संयोजक श्री.सनी भैय्या भोर (सामाजिक कार्यकर्ते) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांच्या पुढाकाराने जवळजवळ नऊ ते दहा विषयांच्यावर ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या पैकी “महाराष्ट्राची साध्याची राजकीय परिस्थिती” या विषयावर वर्धेत कौस्तुभ गणेश पाचडे यांनी आपले रोखठोक- परखड व सत्य परिस्थितीत असलेले मत मांडले व तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत जवळजवळ ४० ते ५० स्पर्धकांनी यशस्वीरित्या सहभाग नोंदवला होता. हि वक्तृत्व स्पर्धा खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी होती. कौस्तुभचे जिल्ह्याभरातून व महाविद्यालयीन स्तरावर अभिनंदन केले जात असून कौस्तुभला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत.