कावड यात्रेत शिवभक्तांच्या गर्दीचा वाढला उच्चांक
हिंगोली (CM Eknath Shinde) : भगवान शंकरावरील आस्थेपोटी निघणारी ही कावड यात्रा (Kavad Yatra) म्हणजे खर्या अर्थाने धर्माचरण आहे, या यात्रेतील युवकांची गर्दी पाहून हिंदूत्वाचे शत्रू जळून खाक होतील असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कावड यात्रेला संबोधताना सांगितले. आ.संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत सामील होण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी हिंगोलीत आले होते.
यावेळी शासनाने जाहीर केलेल्या नवीन योजनांचा मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील लाखो बहिणींना आधार मिळणार असल्याचे ते म्हणाले. या सोबतच लाडका भाऊ योजनेत लाखो तरूणांना आर्थिक मदत होणार तसेच वयस्करांसाठी वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वी मुलींना शिक्षणासाठी ५० टक्के शुल्क भरावा लागत असे, आता मुलींना शंभर टक्के शुल्क माफीची योजना सरकारने जाहीर केली असल्याचेही ते म्हणाले.
शेती पंपासाठी लागणार्या विजेला यापुढे शेतकर्यांना बिल भरावे लागणार नाही. यासोबतच अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक तरतूदही या सरकारने करून ठेवली असल्याचे ते म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रिड व नदीजोड प्रकल्प राबवून ‘मराठवाडा म्हणजे दुष्काळवाडा’ हे कलंक पुसण्याची योजना सरकारने आखली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर आ.संतोष बांगर, आ.बालाजी कल्याणकर, संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, माजी खा.हेमंत पाटील, बाबूराव पाटील कोहळीकर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक सुभाष बांगर, गणेश बांगर, श्रीराम बांगर, राजेंद्र शिखरे, गुड्डू बांगर, बालाजी बांगर, राजू चापके आदींची उपस्थिती होती.
कळमनुरी मतदार संघासाठी दिले २ हजार २०० कोटी रूपये
आ. संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या मतदार संघात विविध विकास कामांसाठी या सरकारने एकूण २ हजार १९५ कोटी रूपयांचा निधी दिला आहे, असे सांगून (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यासपीठावरच आ.बांगर यांना विचारले, मागील सरकारने अडीच वर्षात किती निधी दिला होता, यावर ६७ कोटी रूपये मिळाल्याचे संतोष बांगर यांनी सांगितले.
संतोष बांगर म्हणजे ‘देना बँक’
आ. संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी स्वत:च्या खर्चातून कळमनुरी तालुक्यात विपश्यना केंद्रासाठी चार एकर जमीन खरेदी करून दिली आहे. विपश्यना केंद्राकरीता सरकार निधी देणार आहे. तसेच मतदार संघात सर्व महापुरूषांचे पुतळेही बसविले जाणार आहेत.स्वत:च्या खर्चातून अशी कामे करणारा संतोष बांगर म्हणजे ‘लेना बँक’ नाही तर ‘देना बँक’ आहे, अशा मिश्कील शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ.संतोष बांगर यांचे कौतुक केले. श्रावण महिन्यातील कावड यात्रा (Kavad Yatra) ही आ. संतोष बांगर (Santosh Bangar) यांची ओळख बनली आहे. यापूर्वी सत्ता स्थापनेची धावपळ सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कावड यात्रेला हजेरी लावली होती.