कावड यात्रेत हजारो शिवभक्तांची मांदीयाळी
हिंगोली (Kavad Yatra) : कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून १२ ऑगस्टला सकाळी महादेवाची पुजा अर्चा करून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा (Kavad Yatra) काढण्यात आली. हजारो शिवभक्त या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यात्रेमध्ये भंम भंम भोलेचा जयजयकार दुमदूमला होता. १२ ऑगस्टला चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढण्यात आली होती.
भंम.. भंम .. भोलेचा कावड यात्रेत दुमदूमला आवाज
मोठ्या जल्लोषमय वातावरणात या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. कळमनुरी येथून काढण्यात आलेली कावड प्रत्येक ठिकाणाहून मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी ग्रामस्थांनी व भाविकांनी यात्रेचे स्वागत केले. विशेष म्हणजे यात्रेदरम्यान भाविकांना थकवा जाणवला नाही. अनेक ठिकाणी दानशुर मंडळींनी फळ, फराळ यासह अनेक खाद्यपदार्थाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. विविध ठिकाणी जेसीबीव्दारे मोठ्या पुष्पहाराने कावडचे स्वागत भाविकांनी केले. (Kavad Yatra) कावडमध्ये भाविकांचा एक वेगळाच जल्लोष दिसून आला. आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या वतीने वाटप करण्यात आलेले टि शर्ट घालून शिवभक्त सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी फळ, फराळ अनेक खाद्यपदार्थासह पाण्याचे वाटप
ध्वनीक्षेपकावर अनेक भाविक तल्लीन होऊन शिवशंभोचा जयजयकार करीत होते. यात्रेनिमित्त कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी कावड यात्रेच्या मार्गावर तळ ठोकून होते. त्याच प्रमाणे पोलिसांच्या वाहनांचे पेट्रोलिंग देखील करण्यात येत होते. या कावड यात्रेमध्ये तरूणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या (Kavad Yatra) कावड यात्रे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीत झाला होता. हिंगोलीतील महाराजा अग्रसेन चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीत
मागील अनेक वर्षापासून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढली जाते. त्या निमित्त हजारो शिवभक्त यात्रेमध्ये सहभागी होतात. १२ ऑगस्टला काढलेल्या (Kavad Yatra) कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही उपस्थिती दर्शविल्याने शिवभक्तांचा उत्साह व्दिगुणीत झाला होता.
पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त
कावड यात्रेमध्ये (Kavad Yatra) हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तळ ठोकून होते. टप्याटप्याने ही कावड यात्रा मार्गक्रमण करीत असताना प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला.
दानशूरांकडून फराळासह पाण्याचे वाटप
कावड यात्रेत (Kavad Yatra) हजारो भाविकांचा उत्साह दिसून आला. यात्रेत भाविकांना थकवा निर्माण होऊ नये या उद्देशाने अनेक ठिकाणी दानशुर मंडळींनी फराळासह फळ व अनेक खाद्य पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.