सुहास कनोजे मित्र मंडळाकडून साबुदाणा खिचडीचे वाटप
पुसद (Kavad Yatra) : यावर्षी पाच श्रावण सोमवार पडत असून दि. 26 ऑगस्ट रोजी पुसद शहरांमध्ये श्री धनकेश्वर महादेव मंदिर महाभिषेक करण्याकरिता शहरातील माऊली ग्रुप मार्फत डीजेच्या भक्तिमय गीतांवर महादेवाच्या नावाचा जयघोष करीत महाकावड यात्रा (Kavad Yatra) निघाली होती. तर शहरांमध्ये आज चौथ्या सोमवारी अनेक कावड यात्रा निघाल्या होत्या. या कावड यात्रेमध्ये अबाल वृद्ध भाविक भक्त सहभागी झाले होते.
जागोजागी या महाकावड यात्रेला जागोजागी नागरिकांनी पूजन करून मार्गस्थ होत होती. आहाळे पेट्रोल पंपा जवळ कावड यात्रा येताच मनोज सर्विसिंग सेंटरचे संचालक सुहास कनोजे मित्र मंडळ कडून यात्रेमध्ये सहभागी भाविक भक्तांकरिता साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले. तर असंख्य महिलांनी यावेळी कावड यात्रेचे पूजन केले. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर हे आपल्या पूर्ण स्टाफसह या (Kavad Yatra) कावड यात्रेसह उपस्थित होते. तर त्यांच्या स्टॉफ ने या दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता . छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे वाशिम रस्त्याने सदर भव्य कावड यात्रा श्री धनकेश्वर महादेव मंदिराकडे मार्गस्थ झाली होती.