हिंगोली (Kayadhu Fair) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद हिंगोली मार्फत भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कयाधु प्रदर्शनीत बचत गटाकडून पाच दिवसात सुमारे दहा लाखाच्या वर उलढाल झाली आहे.
राज्य शासनाच्या उमेद जीवनोत्ती अभियान अंतर्गत बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त सीईओ डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर 12 फेब्रुवारी पासून भरविण्यात आली. या प्रदर्शनीत जिल्ह्यातील 100 बचत गटांनी आपले स्ट उभारले आहेत. यामध्ये हळद, मिरची पावडर, खादी कपडे, आवळा मुरब्बा, पापड, मसाले, यासह काहींनी विविध वस्तूंचे स्टॉल उभे केले आहेत. यात हिंगोली करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील पाच दिवसात दहा लाखापेक्षा अधिक बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंची विक्री झाली आहे. दरम्यान ही प्रदर्शनी 12 ते 19 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. ग्रामीण भागातील उत्पाद्दीत केलेल्या उत्पादनाला बाजार पेठ मिळावी हा डोळस उद्देश समोर ठेऊन या मिनी सरस कयाधु जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. या पाच दिवसात प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन उत्पादीत केलेल्या साहित्याची खरेदी केली आहे. त्यामुळे बचत गटांना यांचा फायदा होतो.
सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक प्रयत्न करीत आहेत. पुढील तीन दिवसात आणखी जास्तीत जास्त हिंगोलीकरांनी बचत गटांनी उत्पादित केलेल्या प्रदर्शनीतील स्टोलला भेटी देऊन उत्पादने खरेदी करून ग्रामीण उत्पादनाला हातभार लावावा असे आवाहन प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी केले आहे.




