आखाडा बाळापूर(Hingoli):- कळमनुरी तालुक्यात दोन दिवसापासून दिवसरात्र सतत मोठा पाउस सुरु असल्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आसुन या पावसामुळे (Rain) तालुक्यातील मोठी नदी कयाधु नदीला 2006 नंतर प्रथमच मोठा पुर आला आहे. यापुरामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली तर अनेक गावात नदीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यापावसामुळे नदीनाले पुर येउन अनेक रस्ते दुसऱ्या दिवशी दुपारी उशीरापर्यंत बंद होते. काही भागात हळूहळू पाणी ओसरू लागले आहे तरी आणखी पाउस पडत आसल्यामुळे पाणी वाढण्याची चिन्हे दिसत आहे.
अनेक गावात पुराच पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
कयाधु नदीला रविवारी पुर आला रात्री पुरान रोद्ररूप धारण केले होते. सकाळपर्यंत पुर कायम होता. पूराच पाणी नदीकाठच्या गावात शिरले यामुळे डोंगरगावपूल नदीकाठी आसलेल्या अनेक घरात पाणी शिरले यामुळे गावात पन्नास लोकांना सुरक्षित स्थळी हलवुन त्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याच उपसरपंच गजानन देशमुख व तलाठी विनोद ठाकरे यांनी सांगितले तर शेवाळा भागात नदीला मोठा पुर आला यामुळे शेवाळा ते देवजना, कवडी, नेवरी तलंग रस्ता बंद पडला शेवाळा नदीकाठी पाणी शिरल्याने 300 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आसल्याच माजी सरपंच अभय पाटील सावंत यांनी सांगितले तसेच बिबथर गावात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबाना रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते अस उपसरपंच आनंद शिंदे यांनी सांगितले. सकाळी पाणी ओसरू लागले होते. कान्हेगाव येथे पुराच्या पाण्याने वेढा दिला होता नवीआबादी व इतर भागात पाणी शिरल्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याच बाजार समीती संचालक दता दिलीप माने यांनी सांगितले.जुनी चिखली गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला असुन या भागात पुरामुळे जनावरे वाहून गेली तसेच शेतातील पिकाबरोबर शेतीसाहीत्य नुकसान झाले वाहून गेले असल्याच सरपंच प्रतीनीधी सुरेंद्र सुर्यवंशी व माजी उपसरपंच अमोल चव्हाण यांनी सांगितले.