परभणीच्या केदारवाकडीकडे जाणारा रास्ता
सेलू (Selu Road) : परभणी/सेलू परतुर रोडवरील डॅम फाटा ते केदारवाकडीकडे (Selu Road) जाणारा रोड हा फारच खराब झालेला असून मोठ मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. याच रोड वर ५ कि. मी. अंतरावर निम्न दूधना प्रकल्प ड्यम आहे. हे धरण पाहण्यासाठी बरेच लोकं येत असतात.आणि पुढे २ते ३ की. मी. अंतरावर केदारवाकडी येथे विशाल केदारेश्वर मंदिर आहे. आणि येणारा पुढचा महिना हा श्रावणचा असल्यामुळे या महिन्यात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.
केदारवाकडी हे गाव केदारेश्वर म्हणून पण ओळखले जाते. केदारवाकडी (Kedarwakdi) येथे महादेवाचे मोठे देवस्थान असल्या मुळे, महादेवाच्या दर्शनासाठी (Selu taluka) सेलू तालुक्यातील आणि परतूर तालुक्यातील भाविक हजारोच्या संख्येने येतात. हे लक्ष्यात घेता शासनाने लवकरात लवकर रस्ता बनवण्याचा निर्णय घ्यावा, असे गावाकऱ्यांचे व सर्व भाविकांचे म्हणणे आहे.