पुढील कार्यवाहीकरिता गुन्हा प्रकरण पाठविले नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे
नागपूर () : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचे कार्यक्षेत्र मौदा पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्याने प्रकरण (Nagpur Police) नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. तसे आदेश (Maharashtra Cyber Police) महाराष्ट्र सायबर पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
नागपूर येथील विदर्भ भाजप पूर्व या (Whatsapp group) व्हाटसअॅप ग्रुपवर शिंगाडे नामक मोबाईलधारकाने त्याच्या मोबाईलक्रमांकाच्या व्हाटसअॅपवर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. याबाबत 8 जानेवारी नोडल सायबर पोलिस ठाणे मुंबई येथे फिर्यादीने माहिती दिली. याबाबत तक्रारीवरून शिंगाडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलिस ठाणे येत असल्याने हा गुन्हा पुढील कार्यवाहीकरिता (Nagpur Police) नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे.