आंदोलनाच्या दणक्याने दुसर्या ग्रामसेवकांचे आदेश काढले
आंदोलन मागे
औंढा नागनाथ (Keli villagers Andolan) : तालुक्यातील केळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे ग्रामस्थांना शासकीय व निमशासकीय कागदपत्र देण्यास टाळाटाळ करतात, गावात कोणतीही ग्रामसभा घेत नाहीत, याबाबत विचारले असता उध्दटपणे बोलतात, असे कार्यालयात निवेदन देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे औंढा नागनाथ तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑगस्ट गुरुवार रोजी औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर (Keli villagers Andolan) ठिया आंदोलन सुरू केले होते.
त्यानंतर गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी सायंकाळी सव्वाचार वाजे दरम्यान सदरील ग्रामसेवकाच्या बदलीचे आदेश काढत, त्या ठिकाणी दुसरा ग्रामसेवक दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन (Keli villagers Andolan) मागे घेतले. यावेळी श्रीराम जाधव विलास राठोड विलास जाधव सुधाकर मुंढे संदीप मुंढे विजय जाधव दिगंबर राठोड, रंगनाथ जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




