केनिया (Kenya) : केनियाचा (Kenya floods) जवळपास अर्धा भाग सध्या पुराच्या विळख्यात आहे. या पुरामुळे 103500 लोक बाधित झाले आहेत. तर डझनभर लोकांचा मृत्यू झाला असून, दोन लोक बेपत्ता आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. केनियामध्ये मार्चपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, त्यामुळे अनेक भाग पुराच्या विळख्यात आहेत. केनिया रेड क्रॉसने (Kenya Red Cross) म्हटले आहे की, त्यांनी मार्च महिन्यापासून 188 बचाव कार्य केले आहे.
केनियाची राजधानी नैरोबीमधील (Capital nairobi) अनेक रस्ते बुधवारी बंद करण्यात आले असून, अतिवृष्टीमुळे शेजारील भाग पाण्याखाली गेले आहेत. सिटी सिनेटर एडविन सिफुआ यांनी (social media) सोशल मीडियावर सांगितले की, नैरोबीमधील परिस्थिती खूपच कठीण झाली आहे. जिल्हा सरकारने आधीच आपली सर्व संसाधने वापरली आहेत. एका स्थानिक नागरिकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पीडित मुलगी घराच्या छतावर अडकलेली दिसत आहे.
केनिया रेडक्रॉस सोसायटीने (Kenya Red Cross) सांगितले की, त्यांनी मथरे येथील 18 लोकांना वाचवले आहे. जे काल रात्री नैरोबीला झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथे अडकले होते. देशाच्या इतर भागातही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुराच्या पाण्यामुळे नैरोबीमधील दोन प्रमुख महामार्गांचे काही भाग पाण्याखाली गेले आहेत. जड वाहतुकीची समस्याही येथे दिसून येत आहे. (Kenya floods) केनिया शहरी रस्ते प्राधिकरणानेही पुरामुळे चार रस्ते बंद केले आहेत. तसेच दोन ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.