वायनाड (Kerala Rain) : केरळमध्ये मुसळधार पावसाची (Kerala Rain) शक्यता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये बंद (school closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्यातील 7 जिल्ह्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद जाहीर करण्यात आल्या आहेत. त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी बंद राहतील. प्रशासनाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
वायनाडसाठी ओरंट अलर्ट
हवामान विभागाने शनिवारपर्यंत वायनाड जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. याठिकाणी भूस्खलनामुळे आतापर्यंत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. माहितीनुसार, येथे भूस्खलनात 290 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पलक्कड जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, शिकवणी केंद्रे आणि मदरशांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, महाविद्यालये आणि नवोदय यांसारख्या निवासी शाळा सुरू राहतील.
त्रिशूरमध्येही शाळा आणि महाविद्यालये बंद
मुसळधार पाऊस, (Kerala Rain) जोरदार वारे आणि पाणी साचल्यामुळे त्रिशूरचे डीएम अर्जुन पांडियन यांनी सुट्टीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा, मदत शिबिराचे काम करत आहेत. तथापि, परीक्षा आणि मुलाखती नियोजित वेळेवरच होतील. इडुक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यात मदत शिबिर म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही (school closed) वर्ग होणार नाहीत. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने ही घोषणा केली आहे.
वायनाडमध्ये बचावकार्य सुरू
वायनाडमध्ये, (Wayanad Landslide) कोसळलेल्या इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी बचाव कर्मचारी आव्हानात्मक परिस्थितीत सतत बचाव कार्य करत आहेत. तीन दिवसांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती. केरळचे महसूल मंत्री के. राजन यांनी आतापर्यंत किमान 190 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. (Wayanad Landslide) वायनाड जिल्हा प्रशासनाने सांगितले की, मृतांमध्ये 27 मुले आणि 76 महिलांचा समावेश आहे. प्रामुख्याने मुंडक्काई आणि चुरलमाला 225 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
लष्कर युद्धपातळीवर तैनात, जड उपकरणांची कमतरता
भारतीय लष्कराने CL 24 बेली ब्रिजचे बांधकाम वेगाने पूर्ण केले आहे. हा पूल इरुवनीपझा नदीवरील चुरमाला ते मुंडक्काईला जोडतो. आता ते वाहतुकीसाठी खुले झाले असून लोकांची ये-जा सुरू झाली आहे. (Wayanad Landslide) बचाव कार्यात अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. रस्ते आणि पूल खराब झाल्याने हा संपूर्ण परिसर धोकादायक बनला आहे. अवजड साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे घरे व इमारतींवरील चिखल व उन्मळून पडलेली झाडे काढण्यात मोठी अडचण येत आहे.
राहुल-प्रियांका यांची वायनाडला भेट
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) यांनी गुरुवारी चुरमलाला भेट दिली. राहुल गांधी यांनी वायनाडसाठी (Wayanad Landslide) ही एक भयंकर शोकांतिका असल्याचे म्हटले. या भागात व्यापक काम करण्याची गरज आहे. केरळमध्ये 5 ऑगस्टपर्यंत (Kerala Rain) मुसळधार पाऊस सुरू राहील, असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. बचाव कार्य आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असूनही, परिस्थिती गंभीर आहे.