अर्जुनी मोर (Keshori Police) : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मोर तालुक्याच्या (Keshori Police) केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीत अवैध गुरे वाहतूक करणारी गाडी पकडली दिनांक 11/08/ 2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरे वाहतूक करणाऱ्या गाडीवरती पारत ठेवून त्यांना राजुरी गोठणगाव मार्गावर सापळा रचून 00.15 वाजता गोठणगाव कडे 06 जनावरे घेऊन जनाना क्रूरपणे दाटीवाटीने वाहतूक करतानाM H33- 3298 पिकअप गाडीमधून कोंडून जनावरे छत्तीसगड राज्यातून आणून कत्तलीसाठी जात होते.
केशोरी पोलीस स्टेशन (Keshori Police) अंतर्गत जनावरांची सुटका करण्यात आली. या अवैध जनावरेवाहतूक प्रसंगी 04 लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला .संदर्भ सदर गुन्ह्याची पुढील तपास पोलीस हवालदार निकोडे करीत आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. गोरख भांमरे ,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा., उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, (Keshori Police) केसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे, यांच्या मार्गदर्शनात पोऊपनि हर्षल भाळे ,पोहवा कोकोडे, निकोडे, होळी,पो.ह. डोंगरवार बागडकर ,डुंबरे हातझाडे करीत आहेत.