पुसद (Khandala Police Crime Case) : खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडाळा व आडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारात तुरीच्या पिकामध्ये व इत्यादी पिकांमध्ये चक्क गांजाचे पीक घेत असल्याची बाब गोपनीय खोबऱ्यांमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बिर्जे यांना मिळाली. त्यांनी 21 ऑक्टोंबर रोजी आपल्या पथकासह व (Khandala Police Crime Case) खंडाळा पोलिसांसोबत प्रत्यक्ष त्या ठिकाणी रेड केला. खंडाळा येथील इसम भगवान तुकाराम गादेकर वय 75 वर्ष रा. खंडाळा याने खंडाळा शेत शिवारातील गट क्रमांक 46 मध्ये व आडगाव येथील इसम नथ्थू कोंडबाराव चिरमाडे याने आडगाव शेत शिवारातील गट क्रमांक 102 मध्ये यांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित असलेला व मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अमली पदार्थ वनस्पती झाडाची बेकायदेशीर लागवड करून तुरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्या शेतातलागवड केली.
दोन्ही ठिकाणच्या गांजा पिकांची मोजणी केली असता 50 किलो 500 ग्रॅम ओला गांजा मिळून आला. याप्रकरणी (Khandala Police Crime Case) या दोन्ही समान विरुद्ध सण 1985एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम 8(क ), 20(क ), 22(क )1,26,445 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई जिल्हापोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देविदास पाटील, पोलीस उप निरीक्षक देवानंद कायंदे, सहाय्यक फौजदार विलास राठोड, सुभाष राठोड, जुल्फिकार ,मधुकर पवार, अकील चव्हाण,सलीम शेख, गजानन चव्हाण, भीमराव आडे, पोलीस आमदार सचिन मलाये, पंजाब दयाल व सुनील हगवणे यांनी केली.