पुसद (Khandala Police) : तालुक्यातील कन्हेरवाडी येथील महिला दारूबंदीसह (Prohibition of alcohol) अवैध धंदे परिसरातून हद्दपार करण्यासाठी धडकल्या (Khandala Police) खंडाळा पोलीस स्टेशनवर ठाणेदारांना असंख्य महिलांकडून निवेदन सादर तालुक्यामध्ये कन्हेवाडी गाव आदिवासीबहुल आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाते येथे आदिवास, बंजारा समाज मोठ्या प्रमाणात गुण्या गोविंदाने राहतात बिरसा मुंडा व सेवालाल महाराज जयंती व इत्यादी सण उत्सव एकत्र गुण्यागोविंदाने साजरे करतात अनेक आदिवासी बांधवांना बंजारी भाषा सुद्धा चांगल्या प्रकारे येते गावातील लोकसंख्येच्या मानाने अनेक नोकरदार वर्ग महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक ग्रामसेवक तलाठी पोलीस असे एकूण प्रत्येक घरातील तीन चार व्यक्ती विविध पदावर कार्यरत आहेत. मात्र अलीकडच्या काळात कन्हेरवाडी येथील अवैध्य व्यवसायिकांनी सुरू केलेल्या दारू व अवैद्य धंद्यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत.
असंख्य महिलांचा आंदोलनाचा इशारा
अल्पवयीन मुले जास्त प्रमाणात दारूच्या व मटक्याच्या (Prohibition of alcohol) आहारी जात आहेत.मजूरदार वर्ग 24 तास दारूच्या आहारी गेल्यामुळे मजुराचा प्रश्न या गावाला भेडसावत आहे, तर त्यांच्या परिवारामध्ये कौटुंबिक कलासह परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आहे. गावठी दारू देशी विदेशी दारू मटका जुगार अशा अवैद्य धंद्याचा उत आल्यामुळे कन्हेरवाडी येथील असंख्य महिला व नागरिकांनी कंटाळून (Khandala Police) खंडाळा पोलीस स्टेशनवर धडक देऊन ठाणेदार देविदास पाटील यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. तसेच आठ दिवसात परिसरातून कायमस्वरूपी अवैध धंदे बंद न झाल्यास असंख्य महिला पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करतील महिलांनी दिला आहे. निवेदन देताना ताईबाई गारोळे ,सुंदराबाई डुकरे, रुक्मिणी शिरडे,गोदाबाई बोडके ,लक्ष्मीबाई शेळके ,मंजुळा शिरडे, सुलाबाई बंदुके, संगीता राठोड ,तुळशीबाई दळवे, बालाजी बेले ,पारेश्वर दळवी, अशोक राठोड, नामदेव बेले इत्यादी यावेळी उपस्थित होते.