जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा
भंडारा (Khapa murder case) : तुमसर लगतच्या खापा येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात भावानेच भावाचा मुडदा पाडला असून वहिणीला गंभीर जखमी केले. सदर घटना दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या (Khapa murder case) घटनेतील आरोपी खुशाबराव नत्थू भोयर (२१) रा. खापा याचेविरूध्द दोष सिध्द झाल्याने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपीस आजन्म कारावास व द्रव दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खापा येथील आरोपी खुशाबराव भोयर व मृतक हे सख्खे भाऊ असून एकमेकांच्या शेजारी राहत होते. (Khapa murder case) दोघा भावांमध्ये शेतीच्या जागेवरून जुना वाद सुरू होता. दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान मृतकाच्या पत्नीने घराच्या वरणीत चूल मांडली. वरणीत चूल का मांडलीस या वादावरून झालेल्या भांडणात आरोपी खुशाबराव भोयर याने भावाच्याच डोक्यावर कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. तर मृतकाच्या पत्नीच्या डोक्यावर वार करून जखमी केले. मृतक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली होती.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेता गुन्ह्याचा तपास तत्कालीन सपोनि धंदर यांनी केला. घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांची विचारपूस करून आरोपीस अटक केली. प्रकरणाचा तपास करून प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधिश देशपांडे यांच्या न्यायालयात चालली. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद एैकूण साक्षदार तपासले. न्यायालयाने सदर घटनेचा निर्वाळा देत आरोपी खुशाबराव भोयर याचेविरूध्द आरोप सिध्द झाल्याने कलम ३०२ भादंविमध्ये न्यायालयाने (Khapa murder case) आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता रमाकांत खत्री यांनी सरकार पक्षाकडून न्यायालयात युक्तीवाद केला. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, ‘ाणेदार आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोशि विशाल खंगार यांनी कोर्टपैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.