खापरखेडा (Khaparkheda Crime) : खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत विविध घटनेतील एकुण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. एकीकडे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी संपुर्ण नागपुर जिल्हयाचे प्रत्येक (Khaparkheda police) पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 14/01/2025 रोजी राात्री 23.00 वा. पासुन ऑल ऑऊट कॉबीग ऑपरेशन राबविले होते. ऑल ऑऊट कोंबींग ऑपरेशन मध्ये पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतील सराईत गुन्हेगार व हद्दपार इसमांना चेक करण्यात आले असता (Khaparkheda police) खापरखेडा पोलीसांनी तीन हद्दपार इसम व एक मोटार सायकल चोरीचा आरोपी व एक अवैध देशी दारू विक्रेता यांचेवर कार्यवाही केली.
प्राप्त माहितीनुसार दत्तदेव उर्फ दादु रज्जुराव तेलंगे रा. वार्ड क्र. 4 खापरखेडा, हॅमंत उर्फ सुदामा मधुकर चापाडहाके रा. वार्ड क. 2 खापरखेडा, साहील उर्फ बुट-र्या कैलास बागडै रा. वार्ड क. 1 खापरखेडा असे हद्दपार आरोपीचे नाव आहे. (Khaparkheda Crime) आरोपिंना त्यांचाच घरुन ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता दत्तदेव उर्फ दादु रज्जुराव तेलंगे यांचे घरझडतीमध्ये खापरखेडा पोलीसांना दोन स्टिल धातुची तलवार मिळुन आली.
तसेच वलनी येथे गुप्तमाहीतीवरून इमरान उर्फ खट्टी न्यामुल खान यांला ताब्यात घेऊन खापरखेडा पोलीसांनी त्याचेकडुन दोन चोरीची मोटार सायकल जप्त केली तसेच योगेश रमेश दुरबुडे रा. वार्ड क. 3 खापरखेडा यांचेकडुन (Khaparkheda police) पोलीसांनी 50 देशी दारूची निपा किंमत 3500 रू. ची देशी दारू जप्त करून खापरखेडा पोलीसांनी ऑल ऑऊट कोंबींग ऑपरेशन दरम्यान एकुण 05 कार्यवाही केली.सदर कार्यवाही मा. पोलीस हर्ष पोद्दार सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ सा., यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड सा. ठाणेदार अरविंदकुमार कतलाम सा. व डी.बी.पथक येथील पोउपनि आरती नरोटे, प्रफुल राठोड, शैलेश यादव, प्रदीप मने कविता गोंडाने, मुकेश वाघाडे, राजु भोयर, राजकुमार सातुर व आर सी.पी पथक ना.ग्रा. यांनी पार पाडली आहे.