नागपूर (Khaparkheda Police) : खापरखेड़ा पोलीस स्टेशनच्या (Khaparkheda Police) मागे रेल्वे स्टेशन मागे सहकारी देशी दारुच्या दुकानाजवळ रात्री 9 च्या सुमारास कुत्र्याला का मारले म्हणून विकास आरोपीस विचारत होता त्यातच वाद झाला. (murder Case) आरोपींनी विटा व तलवारीने घातक हमला करून विकास बागडे यास गंभीर जख्मी केले देशी दारुच्या दुकानाच्या सी टीव्ही कैमरात आरोपी विकास वर विटा व तलवारीने हमला केल्याचे दिसून येत आहे. यात तीन आरोपी असून एक विधिसंगर्ष बालक शामील आहे सुरज दिनेश उईके 18 रा. जयभोले नगर तर सुभाष डोमाजी ब्राह्मणकर 25 रा बिना असे अटकेतील आरोपीचं नावे आहेत.
हातोड्याने व लाकडी दांड्याने मारहाण
खापरखेडा पोलीस स्टेशन (Khaparkheda Police) हद्दीतील संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या सिल्लेवाडा येथील मोहम्मद शहिद उर्फ चट्टीला साबीर सैयद वय 27 रा हवामहल वार्ड क्र 4 सिल्लेवाडा या युवकाची रात्री 8.30 च्या सुमारास जुन्या वादातुन हातोड्याने व लाकडी दंडयानी डोक्यावर सपासप वार करीत, शहिदची निर्गुणपणे हत्या (murder Case) करण्यात आली.
या दोन्ही घटनेमुळे दहशत निर्माण
यामध्ये शहिदचा एक कान तूटून बाहेर पडला होता. यामध्ये हत्या करनारे आरोपी हबीब उर्फ छोटू सलमानी वय 27 व नासीर अहमद सलमानी वय 24 दोन्ही रा सिल्लेवाडा असून, दोघेही भाऊ आहेत. हबीब फरार असून नासीर यास अटक केली आहे. शहिदचा भाऊ तनीजच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनेमुळे खापरखेडा परिसरात दहशत निर्माण झाली आहे.