विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
Khaparkheda: दहेगाव (रंगारी) येथील ३० वर्षीय विवाहित तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. निकेस अशोक कळमकर असे त्याचे नाव असून काल ९ मे गुरुवारला सायंकाळी ७ वाजता त्याने आपल्या राहत्या घरी विष (Poison) प्राशन केले. प्राप्त माहितीनुसार मृतक हा सुतार होता व सूतारीचे कामाची मटेरियल आणण्याकरिता त्यानी लोकांकडून उधारीने पैसे घेतले होते मात्र पैसे परत न केल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.
विषारी औषधाची पुडी पाण्यात बुडून पिऊन घेतली
मृतकने राहत्या घरी तणनाशक (Herbicide) विषारी औषधाची पुडी पाण्यात बुडून पिऊन घेतली व त्याची प्रकृती खराब झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी आकाश अशोक कळमकर वय ३२ मोठे भावाने मृतक यास उपचार कामे जावेद हॉस्पिटल (Hospital) पिंपळा (डा.बं.) येथे नेले असता प्रथमोपचार करून पुढील उपचार करिता शासकीय रुग्णालय मेयो नागपूर येथे तेथील डॉक्टरांनी (Doctor) त्यास तपासून मृत घोषित केले.फिर्यादी आकाश अशोक कळमकर वय ३२ मोठे भावाच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास खापरखेडा पोलीस (Police) करत आहे.