मानोरा(Washim):- यावर्षी तालुक्यात खरीप हंगामात सततचा पाऊस (Rain)व जुलै ते ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे खरीप हंगामावर विपरीत परिणाम होवून हंगामातील सोयाबीन पिक शेतकऱ्यांना दिलासा देवू शकला नाही. कपाशी पिकांची स्थिती जवळपास अशीच आहे. हंगामाच्या दिवसातच शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनता दुष्काळाच्या व महागाईची झळ सोसत आहेत.
मान्सूनचा पाऊस वेळेवर बरसल्याने खरीप हंगामाची पेरणी वेळेवर उरकली
यंदा जूनमध्ये मान्सूनचा पाऊस वेळेवर बरसल्याने खरीप हंगामाची पेरणी वेळेवर उरकली. त्यानंतर मात्र जुलै व ऑगस्टमध्ये पिके जोमात असताना सततचा पाऊस व अतिवृष्टी पावसाच्या तडाख्यात अती पाऊस व किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे(Outbreaks of diseases) सोयाबिन वर एलो मोझक, खोडकुज तर कपाशीवर लाल्या व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. या अळीवर व्यवस्थापन होत नाही, तोच ऑक्टोंबरमध्ये अवकाळी परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे सडत आहे. नैसर्गिक संकटाने शेतकरी हतबल झाला असुन तोंडावर आलेला दिवाळी सण(Diwali) साजरा करण्यासाठी धडपड करत आहे.