परभणी(Parbhani) :- पालम तालुक्यातील मौजे केरवाडी येथील रहिवासी असलेले बालासाहेब बापुराव जाधव हे तीन मार्च 2025 रोजी पालम येथे काही कामानिमित्त आले असता त्यांना ताडकळस येथील अंभोरे व कळगाव येथील तुकाराम नामक व्यक्ती यांच्यासह इतरांनी आमची शेती दाखवतो असे सांगून गाडीवर बसून पेठशिवणी मार्गे पूर्णा येथे नेऊन मारहाण (Beating) केली.
बालासाहेब बापूराव जाधव हे पूर्णा येथील रेल्वे पुलाजवळ जखमी अवस्थेत पडलेले आढळून आले
तसेच त्याला मारहाण करून त्याच्याजवळील रोख रकमेसह हातातील अंगठी हिसकावून घेत जखमी अवस्थेत पूर्णा येथील रेल्वे पुलावजवळ टाकून पोबारा केला. संबंधित व्यक्ती हे संध्याकाळी घरी न आल्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी परिसरात व नातेवाईकांकडे विचारपूस करून माहिती घेतली असता ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबीयांना सकाळी गावातीलच व्यक्तींकडून माहिती मिळाली की बालासाहेब बापूराव जाधव हे पूर्णा येथील रेल्वे पुलाजवळ जखमी अवस्थेत पडलेले आढळून आल्याने त्यांना पूर्णा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
ही माहिती कुटुंबीयांना मिळतात कुटुंबातील त्यांचे बंधू व मुलगा यांनी पूर्ण शहराकडे धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे हलविण्यात आले. मुकुंद बालासाहेब जाधव यांच्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांचे आदेशावरून पालम पोलीस ठाण्यात विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांचे मार्गदर्शनाखाली साई पोलीस निरीक्षक आर के मुंडे यांनी तपासाची चक्र फिरून आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपास करत आहेत