परभणी (Parbhani):- येथील रेल्वे स्थानकावर रविवार १२ मे रोजी गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना संशयास्पद रित्या एक मुलगी मिळून आली. अधिक चौकशी केली असता सदर मुलीचे छत्रपती संभाजी नगर येथून अपहरण(Kidnapping) झाल्याचे समजले. आणखी एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आले. सदर मुलीस छत्रपती संभाजी नगर येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
परभणी रेल्वे पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
रेल्वे पोलीस चौकीतील पोना. राम कातकडे, पोशि. डावरे, महिला पोलीस जीने सेवेवर असताना त्यांना स्थानकावर एक मुलगी आणि मुलगा मिळून आले. संशय (Suspicion) आल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. यावर मुलीचे छत्रपती संभाजी नगर येथील अपहरण झाल्याचे समजले. मुलीबाबत संबंधित पोलीस स्टेशनला (Police Station) कळविण्यात आले. पुढील तपासासाठी मुलीला गुन्हा दाखल असलेल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांकडे पालकांच्या उपस्थितीत ताब्यात सुपूर्द करण्यात आले. परभणी(Parbhani) येथील रेल्वे चौकीमधील कर्मचार्यांनी मागील काही दिवसात बेपत्ता मुलींचा शोध लावला आहे.`