पुसद (kidney donation) : पोटच्या मुलाची किडनी (kidney donation) निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या,परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी मुलाला देऊन त्याला दुसऱ्यांदा जीवनदान देणाऱ्या व शहरा नजीक असलेल्या आरेगावच्या एका आईने आपले ममत्त्व कायम ठेवले. किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांनी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. आणि ऋतिकला जीवनदान मिळाले. शहराच्या जवळ असलेल्या आरेगाव येथील ऋतिक प्रकाश ठेंगे (वय २१) हा बीएस्सी अंतिम वर्षाला पुसद येथील फुलसिंग नाईक विद्यालयात शिकतो. जानेवारी महिन्यात त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला पुसद येथील तज्ञ डॉक्टरांना दाखविले असता त्याच्या शरीरातील दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. हे ऐकून त्याची आई वडील व कुटुंबाला मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी रुग्ण ऋतिक याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलमधील किडनी विकार तज्ज्ञ आणि (Kidney transplant) किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. ऋतिकला घेऊन त्याची आई व नातेवाईक डॉ. शहाजी जाधव यांच्याकडे आले. त्यांनी ऋतिकला किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले.
आई दैवत्वच पुन्हा एकदा मुलाला दिले जीवनदान
वडील प्रकाश ठेंगे व आई ज्योती ठेंगे (वय ४५) यांनी धीर न सोडता ऋतिकला बरे करण्याचा आत्मविश्वास मनात जागविला आणि आईने किडनी देण्याची तयारी दर्शविली. तपासणी झाल्यानंतर आईची किडनी (Kidney transplant) ऋतिकच्या शरीरात दान करण्यास योग्य असल्याचे किडनी तज्ज्ञ डॉ. जाधव यांनी नातेवाईकांना सांगितले. दि. २४ एप्रिल हा दिवस ऋतिकसाठी दुसऱ्यांदा जीवनदान देणारा दिवस ठरला. आईच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ऋतिकच्या शरीरात करण्यात आले. प्रत्यारोपण झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे तथा किडनी विकार व (Kidney transplant) प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव, भूल तज्ज्ञ डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली.
दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण
डॉ. शहाजी जाधव यांनी दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant) केले आहे. किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजीनगर येथील श्री गंगा हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत. लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रेज्यूयट इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स हे देशातील सर्वात मोठे किडनी प्रत्यारोपण करणारी संस्था आहे. तेथे डॉ. जाधव यांनी तीन वर्षे सेवा केली. या काळात त्यांनी दीडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे. सम रक्तगट व भिन्न रक्त गट अशा अनेक गुंतागुंतीच्या व जटील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
आई मुळे दुसऱ्यांदा आयुष्याची ज्योत फुलली
माझा मुलगा ऋतिक याची (Kidney transplant) किडनी निकामी झाल्याचे जेव्हा मला कळले तेव्हा मी प्रथम खचून गेले होते. परंतु तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांनी धीर दिला व मार्गदर्शन केले. किडनी दान करून मी माझ्या मुलाचे प्राण वाचवू शकले. त्याचा दुसरा जन्मच झाला. मी आईचे कर्तव्य पार पाडले. याकरिता डॉ. शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटल येथील डॉक्टरांचे उपकार माझ्यावर आहेत अशा भावना मुलाला किडनी दान केलेली आई ज्योती ठेंगे यांनी व्यक्त केल्या.