चंद्रपूर (नागभीड/Chandrapur):- जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मौशी येथील आसाराम दोनाडकर ( 70 ) यांच्यावर जादूटोण्याचा संशय घेऊन प्राणघातक हल्ला (fatal assault) करीत हत्या केल्याची खळबळजनक घटना आज गुरुवार दि.२० जूनला रात्री ९ वाजताचे दरम्यान घडली .
आजच्या घटनेच्या एक महिना आधी त्याचेवर हल्ला झाला होता मात्र त्यावेळी तो बचावला होता . पुन्हा त्याच जादूटोणा (witchcraft) च्या संशयावरून आज गुरुवारी रात्री ९ वाजता दरम्यान गावातील दहा ते बारा नागरिक आसारामजी दोनाडकर यांच्या घरावर हल्ला केला . या प्राणघातक हल्ल्यात आसारामजी गंभीर जखमी झाला, याला ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत (dead)घोषित केले, घटनेची माहिती नागभीड पोलिसांना मिळतात, घटनास्थळ दाखल होऊन काही आरोपींना ताब्यात घेतले,