Mathura-Vrindavan : मथुरा-वृंदावनात प्रवचन देणाऱ्या प्रेमानंद महाराजांनी नद्यांमध्ये तुटलेल्या मूर्ती किंवा (Garland of flowers) फुलांच्या माळा कशा वाहाव्यात हे सांगितले. प्रेमानंद महाराज म्हणाले की, काही लोक देवाचे नाव किंवा त्याच्या चित्रासह वस्तू वापरतात आणि फेकून देतात. असे करणे म्हणजे भगवंताचा अपमान आहे.’ आजच्या काळात स्वार्थीपणा (Selfishness) वरचेवर आहे, त्यामुळे ना नावाचा आदर होतो ना रूपाचा आदर होतो.
लोक देवाची रूपे बनवतात आणि फेकून देतात. जेव्हा तुम्ही देवाच्या रूपांचा, नावांचा आणि धर्मग्रंथांचा (Scriptures)अनादर कराल, तेव्हा तुम्ही त्याची पूजा कशी कराल? उदाहरण देताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, शीख बांधव गुरु ग्रंथाचा किती आदर करतात. ते गुरुग्रंथ सिंहासनावर बसवतात आणि त्याच्यासमोर हात जोडून वाचतात. महाराज पुढे म्हणतात की, जर तुम्हाला तुमचे दुःख नको असेल तर भगवंताच्या नावाचा, रूपाचा आणि शास्त्राचा अपमान करू नका आणि देवाचा व्यापारासाठी वापर करू नका.
महाराज म्हणतात की, तुटलेली मूर्ती (Broken Statue) किंवा फुलांचे हार देखील कोणत्याही नदीत टाकू नयेत. त्यापेक्षा या गोष्टी नदीच्या काठावर असलेल्या छोट्या खड्ड्यात गाडल्या पाहिजेत. अनेकदा नद्यांच्या जवळ पूजा केल्यानंतर लोक तिथे सोडतात किंवा फुले आणि दिवे टाकतात. त्यामुळे हे सर्व साहित्य (Material) लोकांच्या पायाखालून जाते, तर हा सर्वात मोठा गुन्हा आहे. प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, जे देवाचा अपमान करतात, त्यांचा व्यवसाय नष्ट होतो. त्यांच्या शरीरात रोग (Diseases in the body) होतात आणि त्यांना त्रास होऊ लागतो.