India Vs Australia:- भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंच बॉल कसोटीत (Pink Ball Test) दमदार सुरुवात करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कांगारू संघाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर पाय रोवण्याची संधी दिली नाही.
गुलाबी चेंडू कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांसाठी(Indian Batters) परिस्थिती आव्हानात्मक होती. पहिल्या दिवशी डिनर ब्रेकनंतर संघाने ५ विकेट गमावल्या असून एकूण ८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान ऋषभ पंत (Rishabh pant)आणि नितीश रेड्डी क्रीजवर आहेत. या दोन खेळाडूंकडून मोठी भागीदारी अपेक्षित आहे. अशा परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्यात पंत तज्ञ आहे.
राहुल-गिलने संघाची धुरा सांभाळली
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर स्टार्कने यशस्वी जैस्वालला(Yasashvi Jaiswal) एलबीडब्ल्यू आऊट केल्याने भारताला मोठा धक्का बसला. यशस्वी खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारतीय डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ६९ धावांपर्यंत नेली आणि फक्त एक विकेट गमावली. राहुल-गिलने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालला एलबीडब्ल्यू आऊट केल्याने भारताला मोठा धक्का बसला. यशस्वी खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शुभमन गिल (Shubhaman Gill)आणि केएल राहुल (KL Rahul)यांनी भारतीय डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ६९ धावांपर्यंत नेली आणि फक्त एक विकेट गमावली. सर्वे सुरळीत चालत असता भारताचा विकेटकिपर रिषभ पंत याचाही झेल घेऊन बाद करण्यात आले.
भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.