RCB :- आरसीबी टीमचा माजी कर्णधार म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli) एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात इतिहास रचण्याची संधी असेल. वास्तविक, आयपीएल एलिमिनेटर (RCB vs RR) सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना RCB संघाशी होणार आहे. या सामन्यात कोहली मोठा विक्रम करू शकतो. कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 7171 धावा केल्या आहेत. आता आणखी 29 धावा केल्यानंतर कोहली आयपीएलच्या इतिहासात 8000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे. आज म्हणजेच एलिमिनेटर सामन्यात कोहलीला हा इतिहास रचण्याची संधी असेल.
२०२४ आयपीएलमध्ये कोहलीची धमाकेदार कामगिरी
या सीझनपर्यंत कोहलीने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. कोहलीने 14 सामन्यात 708 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटचा फॉर्म पाहता आजही कोहली आश्चर्यकारक कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. कोहलीने आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत. कोहलीने 2016 च्या मोसमात 973 धावा केल्या आहेत. एलिमिनेटरमध्ये मोठी खेळी खेळण्यात कोहली यशस्वी ठरला तर तो या विक्रमावरही आपली नजर ठेवू शकतो.
अंतिम फेरी गाठण्यासाठी आरसीबीला दोन सामने जिंकण्याची गरज
अंतिम फेरी गाठण्यासाठी आरसीबीला दोन सामने जिंकावे लागतील. पहिला एलिमिनेटर सामना नंतर क्वालिफायर 2 सामना, यानंतर RCB फायनल जिंकू शकेल. या मोसमात आरसीबीची कामगिरी सुरुवातीला काही खास नव्हती पण शेवटचे 6 सामने जिंकून या संघाने ऐतिहासिक पुनरागमन केले आहे. अशा परिस्थितीत आता आरसीबी संघही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.