पुसद (Kolkata protest) : कोलकत्ता केआर.जी.कर मेडिकल काॅलेज तथा हाॅस्पीटल मध्ये ती मनाला चटका लावणारी घटना दि.8 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. या अमानुष घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी एक समाजाची जबाबदारी म्हणून दि. 21 ऑगस्ट रोजी येथील नामांकित जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल, मध्ये काळा दिवस पाळून शोक संवेदना व्यक्त केल्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी काळे कपडे घालून व मानवी साखळी बनवून या घटनेचा जाहीर निषेध करीत केंद्र व राज्य शासनाने त्वरित न्याय द्यावा अशी मागणी शासनाकडे केली. या (Kolkata protest) भयंकर भीतीदायक घटनेमुळे समाजमन हादरले आहे.
या संदर्भात समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी. पालक जागरूक राहून आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी समाजामध्ये विकृत माणसे दिवसान दिवस फिरत आहेत. त्यापासून आपल्या पाल्यांचा बचाव करण्याकरिता समाजानेही मोठ्या प्रमाणात पुढे येणे गरजेचे आहे. घटनेचा निषेध म्हणून काळा दिवस पाळून विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षा संदर्भात आवाज उठविला पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीचा जतन केलं पाहिजे. (Kolkata protest) अक्षरशः वेळप्रसंगी विद्यार्थिनींनी आई जगदंबा, महाकाली स्वरूप धारण करायला पाहिजे विकृत व्यक्तींना त्यांची जागा दाखवून त्यांचा तिथेच नायनाट केला पाहिजे तो कोणीही असो समाजमन तुमच्या पाठीशी आहे.
निश्चित जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मार्फत असा अभियानाचा उद्देश होता. तो निश्चित सफल होणार.जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष डाॅ. अमोल मालपाणी सचिव, डाॅ. अस्मिता मालपाणी, प्राचार्या मिनी कुरूप और स्कूल तथा इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या (Kolkata protest) अभियानात सहभागी झाले होते तर या संदर्भात अनेक पोस्टर व बॅनर्स बनविण्यात आले होते जनजागृती करिता या सोबतच बदलापूर येथील घटनेचा व त्यानंतर लगेच अकोला येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सहा अल्पवयीन मुलींवर लैंगिक प्रचार करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकाचा जाहीर निषेध करून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.