डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल व डॉक्टर असोसिएशन
अमरावती (Kolkata Protest candle march) : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात सुद्धा महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. पवार सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून कोलकत्ता येथे एका महिला डॉक्टर वर झालेला अत्याचाराव संवेदना व्यक्त केल्या आहेत. यावेळी शहरातील डॉक्टर्स, परीचारिका यांना सोबत घेऊन पवार शाळेच्या शेकडो यावेळी विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरल्याचे धामणगाव शहरात दिसून आले. कोलकत्ता (Kolkata Protest) येथे एका महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल व डॉक्टर सोसिएशन तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवारला (ता.२१) कँडल मार्च (candle march) काढण्यात आला. यात विद्यार्थी, डॉक्टर, नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे संयुक्त यांचे आयोजन
कोलकत्ता (Kolkata Protest) येथे एका महिला डॉक्टर वर झालेला अत्याचार व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ येथील गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत (candle march) कँडल मार्च रॅली काढण्यात आली.सर्वप्रथम गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला गांधी चौक मधून सुरूवात झाली. तत्पूर्वी घडलेल्या घटनेचा थरार दर्शवणारे वेदनादायी पथनाट्य पवार सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले. कँडल मार्च च्या या रॅली मध्ये डॉ मुकुंदराव के.पवार शैक्षणिक संकुल (मिलिटरी स्कुल)चे जवळपास चारशे विद्यार्थी संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार, संस्था समन्वयक प्रा. जया ल. केने, प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला, प्राचार्य सुशांत देबनाथ, उपप्राचार्य दिप्ती हांडे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
तरुणींमध्ये जनजागृतीची मोहीम
धामणगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष भरत पालीवाल, तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल क्षीरसागर, डॉ. आकाश येंडे, डॉ. महेश साबळे, डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. अग्रवाल , डॉ. गुप्ता, डॉ. मनिष अप्तूरकर , डॉ. देशमुख, डॉ. मयुर भगत, जी.एन. एम. कॉलेजच्या परिचारिका, डॉक्टर या रॅली मध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन हनुमंत ठाकरे यांनी केले. या रॅलीच्या यशस्वितेकरिता दत्तापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सर्व पोलीस कर्मच्यार्यांचे सहकार्य लाभले. (candle march) रॅलीची सांगता विद्यार्थ्यांनी केलेले पथनाट्य व मौन श्रद्धांजलीने करण्यात आली.