मुख्यमंत्र्याच्या पालकत्व गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात कृषी पंपाला फक्त आठ तास वीज पुरवठा?
कोरची (Korachi Farmers) : राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात कृषी पंपांना शासनाने बारा तास विद्युत पुरवठ्याची हमी असताना तालुक्यात फक्त कृषी पंपाला आठ तास विद्युत पुरवठा होत असल्याने मुख्यमंत्र्याच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील धान्य करपू लागल्याने (Korachi Farmers) शेतकऱ्यांची चिंता वाटल्याने शेतकरी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारी आहेत.
उन्हाळी हंगामातील धान्य पीक करपून जात आहे शेतकरी चिंतेत
कोरची येथील 33 केव्ही सबसेंटरला कुरखेडा तालुक्यातील कढोली व गेवर्धा वरुन 12 ,12 तास विज पुरवठा केला जातो सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत गेवर्धा वरुन ऐकणारा वीज पुरवठा हा 24 ते 25 केव्ही असतो पण दिवसा 5 तास लोडशेडींगचं केली जाते तर कढोली वरुन सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत ऐणारा वीज पुरवठा फक्त 18 ते 19 केव्ही असतो. त्यामुळे (Korachi Farmers) कृषी पंपाला तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त 8 तास वीज पुरवठा बरोबर होत आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान्य करपू लागले आहेत. रात्र कढोली वरुन येणारा वीज पुरवठा कमी दाबाचा असल्याने कृषी पंपाला उपयोग होत नाही आहे.
सायंकाळी सहा वाजेपासून घरातील सिलिंग फॅन ,मसाला मिक्स्चर मशीन , कुलरची मोटरीचा पाणी सुद्धा चढत नाही एवढा कमी दाबाचा वीज पुरवठा कोरची केला जात आहे जिल्ह्यात दोन दोन पालकमंत्री असून हे दोन्ही पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यातील लोहखानीच कशा सुरू होतील. याकडे विशेष लक्ष दिले जात आहे पण प्रत्यक्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Korachi Farmers) व जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सोयी देण्यासाठी कसल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन करून वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधले होते पण वीज वितरण कंपनीने कसल्याही प्रकारची सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही पण तालुक्यातील सर्वपक्षीय आंदोलन कर्त्यावरती बेळगाव पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले होते तालुक्यात वीजेचीसमस्या ही गंभीर असून कोरची ला वीज पुरवठा हा चिजगड गोंदिया जिल्हा व कुरखेडा गडचिरोली जिल्ह्यातून होत असतो पण चिचगड वरून विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे तालुक्यात विजेची समस्या गंभीर निर्माण झाली आहे आणि कोरची 33 केव्ही सब सेंटर असून याच सब सेंटर वरुन कोडगुल ढोलडोगरी 33 केव्ही सब सेंटरला वीज पुरवठा केला जात आहे कुरखेडा ला 132 केव्ही सब सेंटरची मागणी (Korachi Farmers) कोरची तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी लावून धरली असतानाही वीज वितरण कंपनीकडून 2024 मध्येच कामाला सुरुवात होत आहे असे सांगितले गेले होते पण अजूनही कामाला सुरुवात झाली नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोरची सबसेंटरला लाखांदूर सब सेंटर वरून सरळ विद्युत जोडणी करीत असल्याचे गेल्या दोन वर्षापासून वीज वितरण कंपनीचे अधिकारी सांगत आहेत पण अजून पर्यंत ते काम पूर्ण न झाल्यामुळे कोरची तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलले असता रेल्वे क्रॉसिंग मधून अंडरग्राउंड वीज जोडणी केबल टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी घेऊन डिमांड भरून काम करणे सुरू असल्याचे सांगितल्या जात आहे पण हे काम केव्हा होईल आणि केव्हा विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
शेतकऱ्यांना धान व मका पिकाला पाणी देण्याची समस्या निर्माण झाली आहे. सरकार कुणाचेही असो, येथील समस्या कायमच आहेत. मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वीजेची समस्या सोडविण्यासाठी आंदोलन उभारले होते. (Korachi Farmers) काही प्रमाणात वीज वितरण विभागाने व्यवस्था करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही. यामुळे यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच कृषीपंप धारकांची समस्या वाढली आहे. यामुळे ही समस्या कधी सुटणार? असा प्रश्नशेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यावर्षी उन्हाळी हंगामातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सध्यातरी दिसून येत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. (Korachi Farmers) पिक जोमात असले तरी पाण्याअभावी फटका सिंचनाची सुविधा नसल्यामुळे सिंचन विहीर अथवा बोरवेलमधूनच पाण्याचा उपसा करून सिंचन करावे लागते. अशा परिस्थितीत नियमीत वीज पुरवठा राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला चांगलाच शॉक लागत असल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या समस्येकडे कुणी लक्ष देईल, काय? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या गंभीर समस्या वरती वीज वितरण कंपनीने तात्काळ उपायोजना करून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा एखाद्या (Korachi Farmers) शेतकऱ्याने ध्यान करू लागल्याने टोकाचे पाऊल उचलल्यास खूप गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल हे मात्र नक्की आहे.