कोरची (Korachi fire) : कोरची येथुन 300 मिटरवर नवरगांव कोरची रोडवर राष्ट्रीय महामार्गावरती आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान छत्तीसगड मधुन मजा तंबाखू गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणारा आर्टिका गाडी (Car fire) जळून खाक झाली. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देण्यासाठी रस्त्याच्या बाजुला असलेल्या पोलला धडक दिली. त्यात गाडी जळून खाक झाली. गाडीमध्ये सुगंधी तंबाखू असल्याने गाडी चालक तिथून फरार झाला. आर्टिका गाडी मालकांचा 20 लाखो रुपयांचा नुकसान झालेले आहे.
आर्टिका गाडी जळून खाक
येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना गाडी जळत असल्याचे दिसून येताच (Nagar Panchayat) नगरपंचायतला माहिती दिली. अग्निशामक गाडी तात्काळ बोलवण्यात आली. गाडीने विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर गाडी जळून खाक झाली. पण गाडी चालक गाडीमध्ये असलेला सुगंधी तंबाखू घेऊन पळाला, अशी चर्चा सुरू आहे. पण उर्वरित असलेल्या गाडीचा तंबाखू गाडीमध्ये दिसत आहे. याचा अर्थ असा की, ही गाडी नेहमी ह्याच रोडवर ती नियमित छत्तीसगड मधून सुगंधी तंबाखू आणून हा कोरची कुरखेडा वडसा, गडचिरोली जिल्ह्यात व गोंदिया जिल्ह्यात सुगंधी तंबाखू पुरवल्या जातो अशी चर्चा सुरू आहे. अखेर गाडी चालक फरार झाला. घटना स्थळी (Korachi Police) पोलीस पोहचले. गावकरी लोकांना माहिती मिळताच पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. गाडी जळाल्याची ही तालुक्यात दुसरी घटना आहे.