कोरची (Korachi Health Department) : इथून 15 किमी अंतरावर असलेल्या चर्वीदंड येथील एका महिलेला आज पहाटेला (pregnant woman) प्रसूतीच्या कळा आल्या. चर्वीदंड ते लेकुरबोडी दरम्यान असलेल्या नाल्यात पुर होते. या पुरातून लेकुरबोंडी पर्यंत 2 किमी अंतर जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही म्हणून तिच्या घरच्यांनी, गावकऱ्यांच्या मदतीने खाटेची कावळ तयार करून चविदंड ते लेकुरबोडी पर्यंत 2 किमी अंतर पायी न्यावे लागले.
माहितीनुसार, चर्वीदंड येथील 23 वर्षीय रोशनी शामराव कमरो या महिलेला आज पहाटेला प्रसूतीच्या कळा आल्या. चविदंड ते लेकुरबोडी दरम्यान नाल्यात पुर आले आहे. या पुरातून मार्ग काढण्यासाठी तिच्या घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने खाटेची कावळ करून तिला लेकुरबोडी पर्यंत घेऊन आले. तिथून खाजगी वाहनाने कोरची येथे घेऊन आले व ग्रामीण रुग्णालयात सकाळी 7.00 च्या दरम्यान दाखल केले. ग्रामीण रुग्णालतील डाॅक्टरांनी नेहमीप्रमाणे तिच्यावर योग्य उपचार न करता, गडचिरोली येथील (Health Department) सामान्य रूग्णालयात रेफर केले. 102 क्रमांकाच्या गाडीने गडचिरोली ला जात असताना बेडगाव- पुराडा दरम्यान असलेल्या घाटमाथ्यावर रस्त्यावरच दोन ट्रक फेल झाल्याने चक्का जाम होता. अशा स्थितीत त्या गाडीवर असणाऱ्या डॉक्टरांनी तिथून 25 किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा इथून 108 क्रमांकाची गाडी बोलावली. उभी असलेली 102 व कुरखेडा इथून आलेली 108 या दोन गाड्या पर्यंत ती गरोदर महिला अर्धा किमी पायी चालत गेली. त्यानंतर तीला गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोग्य विभागाचे तीन तेरा
चविदंड पासून 2 किमी अंतरावर असलेल्या लेकुरबोंडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तिथे सीएचओ डॉ. राहुल कापगते आणि आरोग्य सेविका माधुरी कांबळी आहेत. चर्विदंड पासून 5 कि.मी अंतरावर असलेल्या नवेझरी येथे मानसेवी डॉक्टर, डॉ. ज्ञानदीप नखाते, सीएचओ डॉ. नेहा मेश्राम, (Health Department) आरोग्य सेविका संगिता गडवाल कार्यरत आहेत. परंतु या दोन्ही गावात प्रत्यक्षात एकही डॉक्टर राहत नाही. गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सोई सुविधा योग्य प्रमाणात पुरविल्या जात नाही.
चविंदंड ते लेकुरबोडी या मार्गावर रस्ताच नाही आहे. या दोन गावाच्या दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलही नाही आहे. त्यामुळे या गावाचा पावसाळ्यात जगाशी संपर्क तुटतो. अशा प्रकारचे या तालुक्यात बरेच गावे आहेत की, ज्यांचे पावसाळ्यात संपर्क तुटतो. प्रशासन आणि पदाधिकारी या तालुक्यात चांगले रस्ते करण्यासाठी, ईतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच उदासीन आहेत.