कोरची (Korachi power supply) : तालुक्यातील ग्राम बेतकाठी, बोरी, बेडगाव, मसेली ,कोटरा या गावांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. मागील दिड महिन्यापासून विजेचा लपंडाव आणि भारनियमनाची संतापजनक समस्या वाढलेली आहे. उन्हाळ्याच्या तापमानवाढीमुळे विजेअभावी आरोग्यावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. कृषिप्रधान देशाचा शेतकरी राजा विजेच्या लपंडाव आणि भारनियमनामुळे (Korachi power supply) कमी दाबाचा वीज पुरवठा मुळे चिंतेत पडला असून, शेतीला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.
स्थानिक तालुका मुख्यालयी सुरळीत वीजपुरवठा होत असून, बेतकाठी बेडगाव मसेली आणि कोटरा गावावर अन्याय का ? याचा जाब विचारण्यासाठी रात्री कोरची उपकेंद्र येथे नागरिक आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली. परंतु महावितरणचे अधिकारी (Korachi power supply) वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांना व शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी भेटायला आले नाही त्यांना जे कराचे ते करु द्या अशी प्रतिक्रिया ऑपरेटर ला देऊन फोन बंद करून घरीच राहने पसंत केले . वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
उन्हाळा आता रंगात आला असून विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. त्यामुळे कोरची तालुकावासी त्रस्त झाल्याचे बघावयास मिळत आहे. (Korachi power supply) वीज वितरण कंपनीच्या अनियोजित कामामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, जनसामान्याला असह त्रास होत आहे.