कोरची (Korchi Crime) : बोरी येथील एबीस कंपनी मध्ये आज सायंकाळी 4.30 च्या दरम्यान घडलेली घटना आहे. प्रशांत चोपडे वय 22 वर्षे रा. बंजारी ( बोरी) हा युवक आपल्या सोबत्यांसह विद्युत जोडणी करीत होता. एका बॅरेज ची विद्युत खंडीत झाली होती. (Korchi Crime) मुख्य स्विच बंद करून जिथून विद्युत खंडीत झालेली तिथून विद्युत तारा़ची जोडणी सुरू असताना अचानक कुणीतरी दुसऱ्या ने मुख्य स्विच सुरू केला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून प्रशांत चोपडे जागीच ठार झाला. त्याचे पार्थिव ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणले असून शवविच्छेदन उद्या होईल. (Korchi Police) बेडगांव पोलीस तपास करतील.
प्रशांत चोपडेच्या मृत्यूस एबीज कंपनी जबाबदार, नातेवाईकांचा आरोप
प्रशांत ची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. वडीलाचा छत्र दोन वर्षाआधी हरवल. तीन वर्षांपूर्वी बहीण वारली. आई आणि लहान भावांचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी प्रशांत चोपडे कडे अलगद गेली. मिळेल ते काम करण्याची तळमळ होती. त्यामुळे चार वर्षाआधी जवळच असलेल्या बोरी येथील (Abis Company) एबीज कंपनीत दहा हजार मानधनावर कामावर होता. अशातच काळाने त्याच्यावर झडप घातली नव्हे तर कंपनीच्या हलगर्जीपणा मुळे प्रशांत मृत्यू झाला.
एबीज कंपनीत (Abis Company) महीन्याला अरबो रुपयाची उलाढाल होते. कोरची इथून 10 किमी अंतरावर बोरी आणि जामणारा येथे कंपनीचे पोल्ट्री फार्म आहेत. दोन्ही गावात तीन तीन लाख असे सहा लाख चीक असून उच्च प्रतीचे अंडी पैदास केल्या जाते. दोन्ही ठिकाणी एक हजार पेक्षा जास्त युवक काम करतात. प्रत्येकाला दहा ते पंधरा हजार रुपये मानधन दिले जाते. यांच्या कंपनीत विद्युत विभाग सांभाळणारा एकही जबाबदार आणि अनुभवी व्यक्ती नाही. बोरी येथील कंपनीत विद्युत विभाग सांभाळणारे सहा तरुण आहेत.त्यांच्याकडे पुर्ण कंपनीचा काम आहे. हाच कंपनीचा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा आहे.
दुसरी बाब अशी आहे की, एवढी मोठी कंपनी जंगलात सुरू करण्यात आली. परंतु पर्यावरण खात्याकडून अद्याप परवानगी नाही. 50 एकापेक्षा जास्त जंगलातील झाडे तोडली गेली परंतु वनविभागात त्याची साधी नोंद नाही. 30 ते 40 एकर मोठ्या जंगलाच्या जागेवर कंपनी तयार केली परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या कंपनीच्या पाच सहा परिघातील सहा गावातील लोकांचा कोंबड्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीचा खूप त्रास होतो.लहान मुलांपासून म्हातारी माणसांना मरण यातना भोगावे लागत आहे. (Korchi Crime) गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याविषयी गावकऱ्यांनी सगळीकडे याची तक्रार केली. परंतु त्यावर काहीच परिणाम झाला नाही. या कंपनीचे सर्व सुत्रे राजनांदगांव येथील त्यांच्या मुख्यालयातून चालतात. कोणताच जबाबदार व्यक्ती या ठिकाणी राहत नाही. कोणत्याही तक्रारीचे कंपनी निराकरण करीत नाही. सुधारणा करीत नाही. त्यामुळे ही कंपनी आपल्या परिसरात नाही पाहिजे म्हणून गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित कार्यालयात तक्रार केली आहे.