कोरची (Korchi Death) : तालुका अंतर्गत असलेल्या जामणारा येथील (Korchi Taluka) बंधाऱ्याचे खोदकाम करून कोटगुल मार्गाने कोटगुल येथे विहीर खोदकाम करण्यास ट्रक मध्ये पोकलँड घेऊन जाताना पाटणखास गावाजवळ गावात जाणारी 11 kv च्या विजतारेला स्पर्श झाला. पोकलँडमध्ये बसून असलेल्या ऑपरेटरला विजेचा जबर धक्का लागला. यामुळे ऑपरेटर चेतन आदेचा मृत्यू झाला.
छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवर पाठणखास गावाजवळ घटना
आज सकाळी सुमारे 11 च्या दरम्यान जामणारा येथून बंधाराचे खोदकाम करून कोटगुल येथे विहीर खोदकाम करण्यास ट्रकमध्ये निघालेल्या पोकलँडचा छत्तीसगड येथील गावाजवळ जवळ असलेल्या गावात जाणाऱ्या 11 kv च्या तारांना स्पर्श झाल्यामुळे पोकलँडमध्ये असलेला ऑपरेटर चेतन आदे रा. गांधीनगर याला विजेचा धक्का लागल्यामुळे सोबत दुचाकीत असलेल्या सहकारी सोबत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर (Desaiganj Hospital) ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नेले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. सदर पोकलँड हा (Kurkheda Police) कुरखेडा येथील धनु राऊत यांच्या मालकीची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ऑपरेटर चेतन आदे हा घरी एकुलता एक कमावणारा असल्यामुळे चेतन याच्या आई बाबा व बहीण यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले आहे. सदर तपास (Police Station) पोलीस स्टेशन पाटणखास येथील पोलीस अधिकारी करीत आहेत.