कोरची (Korchi Forest Department) : पाच दिवसापूर्वी गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने कोरची तालुक्यातील बेतकाठी वनपरीक्षेत्रा अंतर्गत अवैध सागवान लाकूड तोड प्रकरणी 3 झाडांचे सागवान झाडाचे लठ्ठे जप्त करून कारवाई केली होती.
सदर कारवाई मध्ये एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली. परंतु घटनास्थळावरून पसार झालेल्या 5 आरोपींचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असल्याचे दिसून येत आहे. बातमी प्रकाशित होताच (Korchi Forest Department) वनविभागाने जंगल परिसरात जाऊन चौकशी सुरु केली असता सदर जंगल परिसरात कित्येक सागवान ची झाडे कापलेल्या अवस्थेत दिसून आली. ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे.
वनविभागाने (Korchi Forest Department) मुख्य आरोपीच्या घराची व शेताची झडती घेतली असता, तिथून सुद्धा लाखो रुपयाचे माल जप्त करण्यात आले. व जंगलात लपविलेला माल सुद्धा जप्त करण्यात आला असून, अजूनही सर्चिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी सुद्धा त्याच परिसरातून झाली आहे कित्येक झाडांची कत्तल
कत्तल करण्यात आलेल्या परिसरात जाऊन आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून, यापूर्वी सुद्धा सदर जंगल परिसरातून लाखो रुपयांच्या झाडांची कत्तल करण्यात आले असल्याचे दिसून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
कुणाच्या आशीर्वादाने सुरु होती तस्करी
वनविभागाचे कर्मचारी हे नेहमी जंगल परिसरात गस्त घालीत असून त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही का? यापूर्वी झालेल्या तस्करीची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती का? सतत होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने काही उपाययोजना केल्या नाहीत का? असे बहुतेक प्रश्नांमुळे शंका उत्पन्न होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे याची सखोल आणि व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
वनविभागाने (Korchi Forest Department) दिलेल्या माहितीनुसार सध्या 5 आरोपी फरार आहेत. परंतु तस्करीचा प्रकार बघता या रॅकेट मध्ये 5 पेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लवकरच सापडतील आरोपी
मागील काही दिवसांपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपी अजूनही पसार असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
-लक्ष्मीकांत ठाकरे, वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय, बेडगाव