बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील आणखी दोन युवकांचा मलेरियाने मृत्यू
कोरची (Korchi Hospital Malaria Death) : कोरची तालुक्यात मलेरियाच्या मृत्यूनंतर (Malaria Death) मुख्य कार्यपालन अधिकारी महीला असल्याने तीनदा कोटगुल परिसरात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि तालुक्यात माता- बाल मृत्यू आणि मलेरिया ने मृत्यू रोखण्यासाठी तालुक्यातील (Korchi Health Department) आरोग्य विभागाला सूचना केल्या पण तालुक्यातील आरोग्य विभागाने मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कसल्याही प्रकारची सुधारणा केली नाही. त्यामुळे पहील्यांदा च गरोदर असलेल्या आशाबाई च्या नवऱ्याचा मलेरिया ने मृत्यू झाला.
इथून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या दवंडी येथील 5 महिन्याच्या गरोदर माता आशा हिच्या पतीचा (Korchi Health Department) आरोग्य विभागाच्या मलेरियाच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला आहे.
विशाल भारत रक्षा वय 26 वर्षे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर धर्मपाल बळीराम पुजेरी वय 25 वर्षे हा भिमपूर येथील युवक सुद्धा 24 जुलैला (Malaria Death) मलेरियाने मृत्यू झाला आहे.
विशालला बरे नाही वाटले, तेव्हा तेथील आशा वर्करनी त्याला मलेरियाचा 18 जुलै ला डोज दिला. नंतर त्याची तब्येत आणखीनच खराब होत असल्याने 19 जुलै ला देवरी येथील डॉ.धुमनखेडे यांचेकडे घेऊन गेले. त्यांनी तपासणी केली असता,मलेरियाने ग्रस्त असल्याचे सांगून त्याला देवरी येथील (Korchi Hospital) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाने त्याच दिवशी रात्रो 12 वाजता गोंदिया ला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफड केले. 24 जुलै पर्यंत विशाल गोंदिया येथील सामान्य रूग्णालयात दाखल होता. तब्येत आणखीनच बिघडत असल्याने नागपूरला रेफड केले होते पण प्रकृती गंभीर दिसल्याने कुटूंबियांनी त्याला तेथीलच बेहेकार हॉस्पिटल मध्ये दाखल केले.अखेर 25 जुलै ला तो मृत्यू झाला.
हा तालुका दिवसेंदिवस (Malaria Death) मलेरियाने ग्रस्त होत आहे. या तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि (Korchi Hospital) ग्रामीण रुग्णालयात दररोज 50 पेक्षा जास्त मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळत आहेत. रुग्णांवर योग्य उपचार न झाल्यामुळे रुग्ण दगावत आहेत.
यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र (Korchi Health Department) कोटगुल इथून 4 किमी अंतरावर असलेल्या एडजाल येथील शिवांगी कैलाश नैताम वय 4 वर्षे हिचा दि.21 जुलै रोजी (Malaria Death) मलेरियाने मृत्यू झाला. त्यापुर्वी याच केंद्राअंतर्गत गोडरी येथील प्रमोद अनिल नैताम वय 6 वर्षे, त्याची बहीण करिश्मा अनिल नैताम वय 8 वर्षे यांचा 10 मार्च रोजी मलेरिया ने मृत्यू झाला. त्याआधी आलोंडी येथील आरती कुंजाम या दिड महिन्याच्या बाळाचा दि. 3 जुनला मलेरिया ने मृत्यू झाला होता. वाको येथील बाली भुवन गंगासागर या दिड महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
या तालुक्यात कोटगुल आणि बोटेकसा या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र (Korchi Hospital) आहेत. या तालुक्यात मानसेवी डॉक्टर आणि सीएचओ डॉक्टर मोठ्या प्रमाणात असून आरोग्य वर्धीनी या ठिकाणी काम करताना दाखविण्यात येते. परंतु जेव्हा जेव्हा प्रतिनिधी या केंद्रांना भेटी देतात, हे डॉक्टर मिळत नाही. महिन्याकाठी एखाद्या दिवशी हे डॉक्टर येतात असे गावकरी सांगतात.
तालुका मुख्यालयी असलेल्या (Korchi Hospital) ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण तालुक्यातील रूग्ण येतात. परंतु ईथे डॉक्टरांची कमतरता आहे. बालरोग तज्ज्ञ व स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची नितांत गरज असतांना यांचे पद रिक्त आहे. ईथे फक्त दोन डॉक्टर कार्यरत आहेत. ईथे येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला योग्य उपचार मिळत नाही. रूग्ण कोणताही असो, रेफर टू गडचिरोली अशीच परिस्थिती आहे.अशीच एक गरोदर माता, तिला चर्वीदंड ते लेकुरबोळी पर्यंत 2 किमी पर्यंत खाटेची कावळ करून आणण्यात आले.
तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे तिच्यावर उपचार न करता तिला रेफर करण्यात आले. बेडगांव ते पुराडा दरम्यान च्या डोंगरमाथ्यावर दोन ट्रक फसले होते. 102 गाडीतील डॉक्टरांनी कुरखेडा इथून 108 मागविली, परंतु 102 पासून 108 गाडी पर्यंत अर्धा किलोमीटर अंतर पायी चालत गेली. (Korchi Hospital) गडचिरोलीच्या सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु बाळ मरण पावले. या मृत्यूला जबाबदार ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आहेत, ज्यांनी उपचार न करता, रेफर केले.
एकंदरीत, या तालुक्यातील आरोग्य व्यवस्था (Korchi Health Department) पुर्णतः ढासळली आहे. याला कारण तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. कारण तालुक्यातील वैद्यकीय सेवा प्रभावीपणे राबविण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. बरेच गावात जाण्यासाठी रस्ता नाही,रस्ता आहे डांबरीकरण नाही.विघुत खंबे आहेत पण लाईन नाही. काही गावात शिक्षणाची सोय आहे,पण शिक्षक नाही.बरेच गावात रस्ते उखडले आहे. यांच्याकडे लोकप्रतिनिधी भेट देऊन तात्काळ सोडविण्यासाठी मागणी गावकरी लोकांनी केली आहे.