कोरेगाव. चोप/गडचिरोली (Koregaon Accident) : देसाईगंज तालुक्यातील चोप. शंकरपुर मार्गावर गावानजीक आग्याबोवा मंदिरात शेजारी रोडच्या बाजूला शेळ्या राखत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने शामराव मोतीराम पर्वते यांना धडक जोरदार धडक दिली. या (Koregaon Accident) धडकेने शामराव यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक स्वप्निल सत्यवान लांजेवार हा गंभीर जखमी झाला.
शामराव मोतीराम पर्वते(वर्षे 63) हे स्वतःच्या घरच्या शेळ्या राखत असतांना, आज दुपारी 12:30 च्या दरम्यान यामा कंपनीच्या दुचाकीने स्वप्नील सत्यवान लांजेवार हा शंकरपुरकडे जात होता. यादरम्यान शामरावला स्वप्निलने दुचाकीने धडक दिली. (Koregaon Accident) दुचाकी एवढ्यात जोरात होती की, शामराव 50 ते 60 फुटापर्यंत फरपडत नेले, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना (Koregaon Hospital) ग्रामीण रुग्णालयात देसाईगंज येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी शामरावला मृत्य घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.
अपघात झाल्यावर (Koregaon Accident) अपघातग्रस्त स्वप्निल लांजेवार हा जखमी अवस्थेत असताना, आमदार कृष्णा भाऊ गजबे हे कोरेगाववरून कार्यक्रम आटवून येत असताना स्वप्निलला स्वतःच्या गाडीत टाकून रुग्णालयात नेले व दाखल करण्यात आले. स्वप्निलची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात गडचिरोली (Gadchiroli hospital) येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास (Gadchiroli Police) पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर ,पोलीस उपनिरीक्षक चौधरी ,पोलीस हवालदार पाळी, कुमोटी अधिक तपास करीत आहेत.