कोरेगाव ,चोप (Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा संतोषला होता परंतु 19 जुलैच्या रात्रभर झालेल्या पावसाने अनेक रस्ते बंद पडले, घर कोसळले, बऱ्याचशा रोवनी ठप्प पडल्या सर्व कामे बंद पडली जुने रस्ते बंद पडल्याने परीसरातील नागरिकांना निसर्गाने जनू नजरबंद केल्यासारखेच घडले पाऊस ओसरल्यानंतर कोरडवाहू व ओलिताची सोय असलेल्या शेतकर्यांची मजुरांनसाठी उडणार तारांबळ.
नाल्याच्या पुलावर पाणी चढल्याने संपुर्ण वाहतूक ठप्प
हवमान विभागाने(Climate Division) 19, व 20 जुलै ला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) चा संकेत दिला आणि 19 जुलै च्या रात्री तालुक्यात रात्रभर जोरदार पाऊस पडला त्यामुळे शंकरपुर, चोप, कोरेगाव मार्ग बंद पडला सकाळची केशोरी, ब्रम्हपुरी बस गेली नी चोप येथील नाल्याच्या पुलावर पाणी चढल्याने संपुर्ण वाहतूक ठप्प झाली. तर मोबाईल टावरचे नेटवर्क सुध्दा बंद पडलेले असल्याने संपर्क इतरांशी संपर्क साधला जाण्यात अडचण निर्माण झाली आहे. अतिवृष्टी (heavy rain) मुळे रात्रीच्या सुमारास हरी गणपत ठाकरे यांच्या घराचा कोपरा कोसळला, तर शेतात पाणी साचल्याने शेतकर्यांच्या रोवनीचे कामे ठप्प पडले जनू निसर्गाने परिसरातील जनतेला आपल्या नजरकैदेत बंद केले की काय? तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम (Public works)विभागाच्या व कंत्राटदाराच्या दुर्लक्षते मुळे चोप, कोरेगाव रस्ता हि बाधीत झाला.
शेतीला चागंल्या झालेल्या पावसाने व ओलीत असलेल्या शेतकर्यांच्या रोवनी कामाला सुरुवात
देशोन्नतीला (Deshonnati)वृत्त प्रकाशित होताच रस्त्यावरील पणि निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या खरी पण त्याचा परिणाम उलटच झाला, कालच्या पावसाने रस्त्यावरील पाणी निघण्या ऐवजी शेतातील पाणी उलट रस्त्यावर आल्याने वाहन चालवतान खड्डा कुठे आहे हेच कळेनासे झाले, तर रस्ताबांधकाम सुरू आहे वाहने हळू चालवावे असे फलकही वृत्त प्रकाशित होताच दोन्ही बाजुला लावन्यात आले. 20 तारखेला पावसाने उसंत दिल्याने शंकरपुर चोप, कोरेगाव मार्ग मोकळा होऊ सकते, व कोरडवाहू शेतीला चागंल्या झालेल्या पावसाने व ओलीत असलेल्या शेतकर्यांच्या रोवनी कामाला सुरुवात एकाच वेळी सुरवात झाल्याने मजूरवर्गाचा तुटवडा भासन्याचे संकेत दिसत आहेत.