कोरेगाव, चोप/गडचिरोली (Koregaon Crime Case) : देसाईगंज पासुन २ किमी अंतरावर शेतशिवारा लगत एका व्रूद्ध इसमाने चिंचेच्या झाडाला दुपट्याच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. माहिती कळताच देसाईगंज पोलिस स्टेशनचे निरिक्षक अजय जगताप, सहा पो निरिक्षक संदिप आगरकर यांचेसह पोलीस विभागाचे कर्मचारी घटना स्थळावर दाखल होऊन अज्ञात इसमाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा मर्ग दाखल केला. मर्ग दाखल होऊन ४ दिवस उलटुन गेल्यावरही अद्याप पर्यंत अज्ञात म्रूतकाची ओळख पटली नाही.
सदर म्रूतकाचे वर्णन रंग सावळा , उंची ५ फुट केस पांढरे , अंगात लालसर रंगाचे टि शर्ट रंगित लोअर घातलेला असुन पोलीस यंञने मार्फत म्रूत व्यक्तिचे फोटो इतर पोलीस स्टेशन ला पाठविण्यात आले नगर परिषद देसाईगंज च्या मार्फती ने सदर म्रूतकाचे शव दे गंज च्या उप जिल्हा रुग्णालयातिल शितग्रूहात ठेवल आहे. म्रूतकाची फोटो प्रसारित करुन माहिती प्राप्त होताच सबंधीत नातेवाईकांनी देसाईगंज पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा, असे आवाहन पो नी अजय जगताप यांनी केले आहे ।