कोरेगाव, चोप/गडचिरोली (Koregaon Death) : देसाईगंज तालुक्यातील चोप येथील उमराव जयसिंग बर्वे वय 56 वर्षे गावाशेजारील बोडीत शिंगाडे तोडण्यासाठी गेला असता परतत असताना ट्यूब पलटल्याने बुडून मृत्यू (Koregaon Death) झाल्याची घटना आज 28 डिसेंबरला दुपारच्या चारच्या सुमारास घडली.
चोप येथे कहार समाजाचे शिंगाडे व मासेमारीसाठी तलाव व बोड्या लीज वर घेतलेल्या आहेत. उमराव हा दुपारी चार वाजताच्या दरम्यान आपल्या नातीला घेऊन गावा शेजारील बेलबोडीत शिंगाडे तोडण्यासाठी गेला काही सहकारी सिंगाडे तोडून घरी परतले. उमराव शिंगाडे तोडून परतत असताना टूबवरील संतुलन बिघडल्याने सिंगाड्याच्या वेलात पडून दुर्दैव मृत्यू (Koregaon Death) झाला उमराव ची पत्नी बोडीच्या पाळीशेजारीच तुरी शेंगा तोडत होती. पतीचा पान्यात बुडत असल्याचे बघून आरडाओरड केली शेजारील नागरिकांनी धाव घेतली उमरावला बाहेर काढले.
परंतु मदत मिळण्या अगोदरच उमराव चा मृत्यू (Koregaon Death) झालेला होता पतीचा आपल्या डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने मृत्यु बघीतल्याने मोठाधक्का बसला घटनेची माहिती देसाईगंज पोलीस स्टेशन ला देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासनीसाठी देसाईगंज येथिल ग्रामीण रुग्नालयात पाठवून घटनेची अधिक चौकशी देसाईगंज पोलीस करीत आहेत. उमराच्या मागे पत्नी एक मुलगा नाती असा परिवारआहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.