आखाडा बाळापूर/हिंगोली (Raksha Khadse) : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे हस्ते ऑनलाइन पी.एम. किसान सन्मान निधी या योजनेचा सतरावा हप्ता वितरण कार्यक्रम व ऑनलाईन प्रणालीद्वारे हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांची संवाद १८ जून २०२४ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणुन रक्षाताई खडसे (Raksha Khadse) युवा कल्याण व क्रिडा राज्यमंत्री, भारत सरकार यांनी पी. एम. किसान योजनेचे लाभार्थी यांना शुभेच्छा दिल्या. शेतकर्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेती करावी, पीक फेरपालट, योग्य पाणी व्यवस्थापन, पिक उत्पादन तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबन करावा व विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाचा अवलंब करावा. कृषी विज्ञान केंद्रद्वारे (Krishi Vigyan Kendra) आयोजित प्रशिक्षणामध्ये शेतकर्यांनी गरजे आधारित प्रशिक्षण घ्यावे व बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बाजू मजबूत करावी. सद्या होत असलेल्या हवामान बदल याचा विचार करून शेतकर्यांनी शेतीचे नियोजन करावे व प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संगोपन करावे, असे (Raksha Khadse) त्यानी सांगितले.
तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी उपस्थित शेतकर्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक उत्पादन कशाप्रकारे वाढ होईल याबद्दल मार्गदर्शन केले, हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादन क्षेत्र हे सर्वात जास्त असून हळद कमी खर्चामध्ये योग्य तंत्रज्ञानाची सांगड घालून शेतकर्यांच्या उत्पादन कशाप्रकारे वाढेल यावर लक्ष केंद्रित केले. तसेच विद्यापीठाकडून विकसित झालेले विविध वाणाचा प्रचार व प्रसार हा विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत कसे पोहोचेल याबद्दल उपस्थित शेतकरीवर्गांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमामधे विशेष निमंत्रीत मा.श्री. जितेंद्र पापळकर (जिल्हाधिकारी) हिंगोली, यांनी कृषि विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra) हे हिंगोली जिल्हातील शेतकर्यांना समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहत असुन कृषि विज्ञान केंद्राचा शास्त्रज्ञाचा सल्ला घेऊन शेतकर्यांनी शेती करावी असे आव्हान केले. मा.डॉ.एस.के. रॉय (संचालक) अटारी पुणे, यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करत असताना कृषी विज्ञान केंद्राचा शेतकर्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाची जोड घालून आपल्या उत्पादनात वाढ करावी.
या कार्यक्रमाचे आयोजक व स्वागतपर भाषांनामध्ये मा. खा. अॅड. शिवाजीराव माने (अध्यक्ष) संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली यांनी हिंगोली जिल्हा हा भारतातील सर्वात जास्त हळद उत्पादन करणारा जिल्हा असून शेतकर्यांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर ची आवश्यकता आहे तसेच हळद प्रक्रिया उद्योगांमध्ये प्रोसेसिंग करण्यासाठी शेतकरी बांधवांचे कष्ट कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमा मध्ये आ. डॉ. प्रज्ञाताई विधान परिषद, आ. तानाजीराव मुटकुळे, डॉ. एन डी गोखले विस्तार शिक्षण संचालक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, माजी आमदार गजानन घुगे कळमनुरी, फुलाजी शिंदे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कदम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्रीकांत पाटील चंद्रवंशी भाजपा लोकसभा समन्वयक, पप्पू चव्हाण भाजयुमो जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांबाळे भाजपा महिला जिल्हाध्यक्षा प्रमुख, शंकर सूर्यवंशी तालुका, सुरेखा नांदे तहसीलदार कळमनुरी व डॉ.पी.पी.शेळके (वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख) कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये समूह पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाची घडीपत्रिका, स्वच्छता अभियान व नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मिती या घडी पत्रिकेची विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये कृषी सखींना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र व आर.पी. यल अंतर्गत नर्सरी वर्कर रोपवाटिका कामगार प्रशिक्षण प्रमाणपत्र सुद्धा वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश भालेराव विषय विशेषज्ञ कृषी विद्या, अनिल ओळंबे विषय विशेषज्ञ उद्यान विद्या, अजय कुमार सुगावे विषय विशेषज्ञ पिक संरक्षण, रोहिणी शिंदे विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, डॉ. अतुल मुराई विषय विशेषज्ञ कृषी विस्तार, साईनाथ खरात विषय विशेषज्ञ मृदा विज्ञान, शिवलिंग लिंगे, डॉ. कैलास गीते कार्यक्रम सहाय्यक पशु विज्ञान, मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव मारुती कदम, संतोष हानवते व प्रेमदास जाधव, राघोजी नरवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी, सरपंच, अनेक गावातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट प्रतिनिधी, कृषि सखी व ग्रामीण युवक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या (Krishi Vigyan Kendra) कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय ठाकरे कार्यालीन अधीक्षक व आभार प्रदर्शन डॉ.पी.पी.शेळके यांनी केले.