कृषी पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत संपन्न
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Krishibhushan Award) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये पार पडला. यामध्ये चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील (Pandurang Devidas Shinde) पांडुरंग देविदास शिंदे यांना (Krishibhushan Award) कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला
या भव्य दिव्य कार्यक्रमात सन 2020, 2021 व 2022 या 3 वर्षातील (Krishibhushan Award) एकूण 448 पुरस्कार महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मा. कृषी मंत्री धनंजय मुंडे हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यभरातून ५ हजारांवर शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. महामहिम राज्यपाल महोदयांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्व पुरस्कार स्वतः वितरित केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मा. कृषी मंत्री यांनी केले.
या (Krishibhushan Award) कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करून देऊन मार्गदर्शक दूत म्हणून कार्यरत राहावे, असे आवाहन मा.कृषी मंत्री यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कर्मचारी व अधिकारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कृषिभूषण (सेंद्रिय शेती) २०२१ पांडुरंग देविदास शिंदे मु. मंगरूळ, पो. इसरूळ, ता. चिखली जि. बुलढाणा यांना सेंद्रिय तंत्रज्ञानाचा अवलंब व प्रसार करून कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याप्रित्यर्थ कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रशस्तीपत्रकावर,सी.पी. राधाकृष्णन राज्यपाल,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ,देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री,अजित पवार उपमुख्यमंत्री,धनंजय मुंडे मंत्री, कृषि अदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.