पुसद (Krishnanagar Gram Panchayat) : पुसद पंचायत समिती (Pusad Panchayat Samiti) अंतर्गत येत असलेल्या कृष्णनगर ग्रामपंचायत (Gram Panchayat) हद्दीतील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी दि. 4 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या संदर्भात गंभीर आरोप करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.ते म्हणतात की, घरकुलची मागणी करणाऱ्या लाभार्थ्याकडून दहा हजाराची मागणी ग्रामपंचायत मार्फत केली जात असून पैसे दिले तरच घरकुल मिळतील, असा अट्टाहास ग्रामपंचायत कडून होत असल्याच्या बाबीची शहानिशा गटविकास अधिकारी करावी. नागरिकांना घरकुलापासून दूर का ठेवल्या जात आहे. याचीही पाहणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून होऊन दोषींवर कारवाई होण्याची गरज असल्याची भावना या उपोषणकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
शौचालय बांधकामासाठी लाखो रुपये खर्चून त्याचा उपयोग होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. शौचालयास जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध केला नाही. त्यामुळे याही निधीचा सदुपयोग झाला नसल्याची नाराजी गावकऱ्यात उमटत आहे. पावसाळ्यात सुद्धा पाच दिवसाला आड पिण्याचे पाणी मिळत असल्याची ओरड होत असतानाही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करते. गावामध्ये अनेक विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे आणि त्याबाबत अनेकदा तक्रारी निवेदन आणि तोंडी सांगून सुद्धा यावर उपाययोजना होत नसल्याने या (Gram Panchayat) ग्रामपंचायत जाग आणण्यासाठी नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणकर्ते राहुल कैलाश चव्हाण व ईश्वर काळु राठोड हे नागरिक बसले आहे.
सदर (Gram Panchayat) कृष्णनगर ग्राम.पं. समोरील सुरू असलेल्या आमरण उपोषणाला दि. 4 ऑगस्ट च्या रात्री दहा वाजता जाऊन भेट दिली, ग्रामस्थांना उपोषण सोडण्याची विनंती केली, संबंधित गायकवाड नामक ग्रामसेवकाला उपोषण करताना हवी ती माहिती पुरविण्याचे सांगितले आहे.
– प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस