कुलजमाती संघटनेचे प्रशासनाला निवेदन
पाथरी (Maratha OBC) : परभणी/पाथरी तालुक्यातील एका मुस्लिम युवकाच्या गाडीवर बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी जवळ गुरुवार २७ जून रोजी रात्री अज्ञात जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली असुन बीड जिल्ह्यातील (Maratha OBC) मराठा ओबीसी वादामुळे परिस्थिती बिकट झालेली असल्याचे म्हणत परिस्थिती बिघडू नये याची शासनाकडून दक्षता घेण्यात यावी अशा मागणीचे एक निवेदन कुलजमाती संघटनेच्या (Kuljamati Sanghatan) वतीने प्रशासन व शासनाला शुक्रवारी देण्यात आले आहे.
अज्ञात समाजकंटकानी मुस्लिम युवकाच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर निवेदन सादर
पाथरी तालुका व शहर कुलजमाती संघटनेच्या (Kuljamati Sanghatan) वतीने पाथरी तहसीलदार यांना शुक्रवार 28 जून रोजी एक निवेदन सादर करण्यात आले यामध्ये म्हटले आहे की ,गुरुवार 27 जून रोजी रात्री दहाच्या सुमारास तालुक्यातील वाघाळा येथील शेख दगडू शेख नायब हा युवक शेती मशागत यंत्र नारायणगाव येथील एका ग्राहकाला देऊन परत येत असताना भगवानगड ते पाडळसिंगी दरम्यान नगर महामार्गावर काही अज्ञात समाजकंटकांनी सदरील युवकाची गाडी थांबवून व आडनाव विचारले असतायुवकांनी आडनाव शेख सांगताच उपस्थित अज्ञात समाजकंटकांनी शेख दगडू ची पिकअप क्रं . एमएच ४८ एजी ८२७५ या गाडीवर हल्ला करत काचा फोडल्या व शिवीगाळ केल्याचे नमुद केले आहे.
पाथरी तालुक्यातील युवकाची बीड जिल्ह्यात शिवीगाळ करत गाडी फोडली
बीड जिल्ह्यातील (Maratha OBC) मराठा ओबीसी वादामुळे परिस्थिती बिकट झाल्याचे शासन प्रशासनास निदर्शनास आणून देत या वादामुळेच शेख दगडू याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. ही परिस्थिती चांगली नाही आणि त्यामुळे एक दोन नाहीतर तीन समाजामध्ये तेढ आणि द्वेष निर्माण होऊन परिस्थिती बिघडू शकते व समाजात द्वेष पसरू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे. शासन प्रशासनाने (Maratha OBC) मराठा ओबीसी वाद वाढू देऊ नये तसेच त्याचा परिणाम मुस्लिम आणि इतर समाजावर होऊ देऊ नये व अशा प्रकारे मारहाणीचे प्रकरणे पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी विनंती ही दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर (Kuljamati Sanghatan) कुल जमाती संघटना पाथरी तालुका पदाधिकारी व मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत .