बल्लारपूर(Ballarpur) :- बल्लारपूर शहर लागत बामणी ग्रामीण शिवारात असलेल्या बामणी प्रोटीन कंपनीला कूलुप लावण्यात आली आहे. आज दि. २०/०५/२०२४ रोजी सकाळी कंपनीचे कर्मचारी कंपनीला दाखल झाल्याने कंपनी गेटवर कंपनी बंद व कर्मचार्यांना कामावर येऊ नये म्हणून गेटवर नोटीस लावण्यात आले.
कंपनी बंद झाल्याने शेकडो कर्मचार्यांना वर उपासीमारीची पाळी
तसेच मेन गेट वर कूलुप लावण्यात आले. या कंपनी बंद झाल्याने शेकडो कर्मचार्यांना वर उपासीमारीची पाळी (Starvation period) आली आहे. बामणी प्रोटीन कंपनीची स्थापना १९८० साली झाली होती. त्या वेळी हा कंपनी थापर व्यवस्थापनाकडे होती. त्या नंतर १९९८ मध्ये सध्याचे व्यवस्थापकांनी बामणी प्रोटीन कंपनीला हाती घेतला. त्या पासून हा कंपनी सुरळीतपणे चालत होता. सध्या पर्यावरण नियमांचा उल्लंघनाच्या (Violation of rules) तक्रार झाल्यावर सदर कंपनी बंद करण्यात आली आहे. कंपनीमध्ये सध्या ७९ टक्के कायमस्वरूपी कामगार, कंत्राटी कामगार ७९, २६ ऑफिस कर्मचारी व इतर ४ असे एकुण १८८ कर्मचारी कार्यरत असल्याचे माहिती कंपनी कर्मचारी यांनी दिली. कर्मचारी यांची मोठी संख्या असलेल्या कंपनीला कूलुप लावण्यात आल्याने कर्मचार्यांवर मोठी संकट निर्माण झाली आहे. कर्मचारी एकत्र येऊन कंपनीच्या मेन गेट सामोरं धरणे प्रदर्शन सुरू केली आहे. कर्मचारी यांच्या म्हणने प्रमाणे कंपनी व्यवस्थापन समस्याचा तोडगा न काढता कंपनी बंद करण्याचा निर्णयामुळे कर्मचारी संकटात पडले. कंपनी कर्मचार्यांवर उपासमारीचे संकट आले आहे.