मानोरा (Prakash Ambedkar) : कुणबी, मराठा उमेदवाराला मतदान न करता ओबीसी उमेदरालाच मतदान करा, असे खळबळ जनक वक्तव्य दि. ४ ऑगस्ट रोजी पोहरादेवी येथे वंचितचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रा रॅली प्रसंगी संबोधित करतांना केले. यावेळी त्यांनी महंत सुनील महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत देवी देवतांचे दर्शन घेतले.
यावेळी व्यासपीठावर महंत रमेश महाराज, तालुका प्रमुख विनोद राठोड, विधानसभा संपर्क प्रमुख अभिजीत राठोड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. पुढे ऍड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, ठाकरे गटाच्या युतीवर बोलत असताना एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते. युतीच्या शक्यतेवर आर्थोपडीक डॉक्टराला विचारावा लागेल असे सांगत ओबिसी मतदारालाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती.